अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचे शासकीय पद्धतीनेअनावरण आ. आशुतोष काळेंची ग्वाही,मातंग समाज क्रांती मोर्चाचे आमरण उपोषण सुटले…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण त्यांचे नातू सचिनभाऊ साठे यांच्या हस्ते होणार असल्याची ग्वाही दिल्यामुळे मातंग समाज क्रांती मोर्चाच्या वतीने सुरु असलेले आमरण उपोषण मागे घेण्यात आले आहे.या अनावरण सोहळ्याला सर्व समाज बांधवांसह अण्णाभाऊ साठे प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन देखील आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण करण्यात यावे ह्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यासाठी मातंग समाज क्रांती मोर्चाच्या वतीने कोपरगाव येथे आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते. त्या उपोषणाची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण करण्यासाठी पुढाकार घेत सोमवार (दि.०७) रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिनभाऊ साठे यांच्या हस्ते अनावरण करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला सूचना केल्या आहेत. याची लेखी स्वरूपात माहिती उपोषण कर्त्यांना देण्यात आली.
त्यावेळी प्रमुख मागणी पूर्ण झाल्यामुळे इतरही मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी मागणी यावेळी मातंग समाज क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली. त्या मागण्या देखील पूर्ण करणार असल्याची ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे उपस्थित होते. साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण होणार असल्यामुळे मातंग समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांनी आ.आशुतोष काळे,मा. नगराध्यक्ष विजय वहाडणे व कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाचे आभार मानले आहे.

फोटो ओळ- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण करण्याची ग्वाही दिल्यामुळे मातंग समाज क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *