सूर्यतेज संस्था,कोपरगांव “उजळूया अंधार सारा” स्थापना आषाढी एकादशी – २००१:- सुशांत घोडके…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
दि.१० जुलै रोजी सूर्यतेज संस्थेच्या स्थापना दिनाचा २१ वा वर्धापन दिन…
सूर्यतेज संस्थाच्या २१ व्या स्थापना दिनानिमित्त सूर्यतेज परिवाराचे सर्व सदस्य… प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी होवून सहकार्य करणारे सर्व मान्यवर महोदयांचे आभार…
२१ वर्षात शैक्षणिक , कला,क्रीडा,नाट्य,सांस्कृतिक, सामाजिक यासह स्वच्छता,जलशक्ती अभियान, वृक्षारोपण आणि पर्यावरण…”कोपरगाव फेस्टिव्हलचे” माध्यमातून ज्ञान-कला-मनोरंजनाचे उपक्रम यासह विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेवून यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे…
सूर्यतेजच्या अनेक उपक्रमांची कोपरगावसह सर्वदूर दखल घेतली आहे.आपण सर्वांचे सहकार्यांनेच “उजळूया अंधार सारा” या ब्रीद वाक्या प्रमाणे सूर्यतेजचा २१ वर्षांचा निरंतर सुरू असलेला प्रवास पहातो आहोत… या प्रवासात आपण सर्वच सार्वजनिक “जनसेवेचे वारकरी” आहात…कळत नकळत २१ वर्षाच्या कालखंडात आपणही एखाद्या उपक्रमात सन्मानाने सहभागी झाला असेलच…आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोपरगांव परीसराच्या सार्वजनिक जडणघडणीत सूर्यतेज संस्थेच्या सदस्यांनी योगदान दिले आहे…
आपला सहभाग आणि सहकार्याने सूर्यतेज संस्थेच्या विविध उपक्रमांची ही “सेवाव्रती दिंडी” यापुढेही राष्ट्र हितार्थ समर्पित भावनेने मार्गक्रमण करत राहिल…आपणा सर्वांचे सहकार्य, मार्गदर्शन यापुढेही राहो…आपले मनापासून आभार…
आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा…

  • सुशांत घोडके
    संस्थापक – सूर्यतेज संस्था,कोपरगांव
    आपली मदत सूर्यतेज संस्था,कोपरगांव या नावे रोख/चेक/डीडी/थेट बँक खाते मध्ये/साहित्य वस्तू स्वरुपात करु शकतात…
    आपल्या थेट मदतीकरिता…
    Account Name – Suryatej Sanstha,Kopargaon
    ★Bank Name – Bank Of India, kopargaon Branch
    Account No.- 066210110007721
    IFSC Code – BKID0000662
    MISC Code – 423013001

सूर्यतेज…

उजळूयाअंधारसारा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *