शरद पवार यांचे लोकाभिमुख नेतृत्व देशाला मान्य, त्यांचे विचार जनतेपर्यंत पोहचवा:- छगन भुजबळ…

Uncategorized

नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ यांचे मार्गदर्शन…

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घ्यावी:- छगन भुजबळ…
कोपरगाव प्रतिनीधी:-
(नागपूर):-
शरद पवार यांचे लोकाभिमुख नेतृत्व देशाला मान्य, त्यांचे विचार जनतेपर्यंत पोहचवले पाहिजे त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेपर्यंत पोहचले पाहिजे, त्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले नागपुर येथे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी ते बोलताना म्हणाले की, १९९९ ला पक्षाची स्थापना झाल्यानंतर पार्टीचा पहिला प्रदेशाध्यक्ष म्हणुन मला जबाबदारी मिळाली होती पक्ष संघटना मजबुत करण्याचे मोठे काम आम्ही महाराष्ट्रभर फिरुन कार्यकर्त्यांच्या जोरावर केले. अनेक अडचणींचा सामना करावा लागला असला तरी महाराष्ट्रात नेहमीच पक्ष पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर राहिला आहे अशी आठवण सांगतानाच. देशात सर्व प्रश्नाची जाणं असणारे आणि प्रत्येक प्रश्नांना वाचा फोडणारे नेते म्हणजे आदरणीय शरद पवार आहेत त्यामुळे विचारांची पक्की बैठक असणारे नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वच जण काम करत आहोत. महाराष्ट्र नेहमीच पवार साहेबांच्या पाठीमागे उभा राहिला आहे त्यामुळे आगामी काळात देखील प्रत्येक कार्यकर्त्याने आणि पदाधिकाऱ्याने पक्ष विस्तारासाठी काम करावे असे आवाहन केले पाहिजे
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह माजी मंत्री रमेश बंग,शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे,शब्बीर विद्रोही, अनिस देशमुख, बापू भुजबळ, प्रा दिवाकर गमे, राज राजापूरकर,प्रवीण कुंटे पाटील इ. उपस्थित होते.
केंद्र सरकार अध्या विरोधी पक्षातील नेत्यांची मुस्कटदाबी करत आहे. मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवले जात आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधकांवर दबाव निर्माण करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. त्यामुळेच आज नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावर अन्याय झाला असा थेट आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केला.
यावेळी ते म्हणाले की, आज देशात बेरोजगारी आणि महागाईसारखे महत्वाचे प्रश्न जनतेसमोर असताना हनुमान चालीसा, लाऊस्पिकर, मंदिर – मस्जिद असे मुद्दे उभे करून लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहंमद प्रेषितांवर चुकीचे विधान करून देशात एक वेगळे वातावरण तयार केले आहे. त्याचा परिणाम हा देशावर होतोय अनेक अखाती देश आपल्या देशाचे उत्पादन घेण्यास तयार नाही पण मला त्यांना सांगायचे आहे. एकटी नुपूर शर्मा किंवा भाजपा म्हणजे भारत नाही. हा भारत हिंदू-मुस्लिम सर्वांचा आहे सर्व धर्मीयांचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *