
कोपरगाव प्रतिनिधी:-
विशेष पथकातील पोलीस हवालदार 445/देवकिसन गायकर, पोअं./सानप व पोअं/बागडे यांना गोपनीय बातमीदार यांचेमार्फत माहिती मिळाली की, दोन इसम बालाजी एजन्सी समोर, रविवार कारंजा, नाशिक या ठिकाणी एमडी विक्री करीता येणार आहेत.
मिळालेल्या गोपनीय माहितीची खात्री करून कारवाई करणेकरीता मा. श्री. संदिप मिटके, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे लेखी आदेशान्वये दिनांक १९/०६/२०२४ रोजी १९ः४५ वाजेच्या सुमारास वपोनि/पायगुडे , सपोनि/नागरे व पथकाने सापळा रचून रविवार कारंजा कडुन रेड कॉस सिग्नलकडे जाणारे रोडवर, बालाजी एजन्सी समोर, अँक्सीस बँके जवळ, रविवार कारंजा, नाशिक येथे इसम नामे १) धिरज धनराज चांदनानी, वय २४ वर्षे, रा. श्रीकांत गोगाटे यांच्या घरात भाडयाने गोगटे बंगलो, रूम नंबर ४, श्रीरामवाडी, एम. जी. रोड, नाशिक, २) रोहीत सुनिल अहिरराव, वय २७ वर्षे, रा. फ्लॅट नंबर ७, सुयश अपार्टमेंट, रामकृष्ण नगर, शांतीनगर, मखमलाबाद शिवार, नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांच्या अंगझडती मध्ये एकुण ३२ ग्रॅम वजनाचा व १,६०,०००/- रू. किंमतीचा, एम.डी. म्हणजेच मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ बेकायदेशिररित्या कब्जात बाळगुन स्वतःच्या फायदयासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने मिळुन आला, म्हणुन वर नमुद दोन्ही आरोपी यांचेविरूध्द पोलीस हवालदार 445/देवकिसन गायकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल करून *एन.डी.पी.एस. १९८५ चे कलम ८ (क), २२ (ब) सह २९ प्रमाणे सरकार वाडा पोलीस ठाणे येथे गु.र.क्रमांक 173/2024, एनडीपीएस कलम 8(क), 22(ब) सह 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. संदिप कर्णिक साो. (पोलीस आयुक्त), मा. श्री प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा. श्री. संदिप मिटके साो. (सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे) यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सपोनि/हेमंत नागरे, पोउपनि/ मुक्तेष्वर लाड, ग्रेड पोउपनि/ भोई, सपोउपनि /रंजन बेंडाळे, पोहवा /१०६ किशोर रोकडे, पोहवा/1185 ताजणे, पोहवा./445 गायकर, पोना/५६१ योगेश चव्हाण, पोना.६३६ जगझाप, पोना./1731 कोल्हे, पोना/९११ दत्ता चकोर, पोअं/२४३२ बाळा नांद्रे, पोअं./राऊत, पोअं/२४३३ चंद्रकांत बागडे, पोअं/२२१८ विठ्ठल चव्हाण, मपोअं./२३६६ भड, सर्व नेम. विशेष पथक, गुन्हे शाखा, नाशिक शहर या पथकाने कामगिरी केलेली आहे.
