“पुणतांबा चौफुली येथे सर्कलची उभारणी करावी”:- अँड.नितीन पोळ…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
नगर-मनमाड हाय वे व मुंबई-नागपूर हे महत्व पूर्ण मार्ग असलेल्या पुणतांबा चौफुली येथे सर्कल ची उभारणी करावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की नगर – मनमाड व मुंबई – नागपूर या अत्यंत रहदारी असलेल्या महामार्गावर पुणतांबा चौफुली येथे वाहतुकीची अत्यंत वर्दळ असते त्यामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे या अपघातात अनेक वाहन चालकांना कायमचे अपंगत्व तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे वारंवार मागणी करून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी स्पीड ब्रेकर,दिशादर्शक फलक, रिप्लेक्टर लावलेले नाही. सद्या या ठिकाणी अनेक व्यावसायिकांनी विविध फळे, नास्ता, भाजीपाला विक्री व किरकोळ वस्तू विक्री करणारी दुकाने,जवळच हॉटेल,पेट्रोल पंप आहेत त्यामुळे या परिसरात नागरिकांची नेहमी वर्दळ
पूर्वेला नागपूर हाय वे व श्रीरामपूर कडे जाणारा रस्ता असून जवळच संत जनार्धन स्वामी आश्रम व मंगल कार्यालये तसेच एस जे एस हॉस्पिटल तर दक्षिणेकडे शिर्डी सारखे जागतिक कीर्तीचे धार्मिक स्थळ व पश्चिमेला नाशिक व संगमनेर कडे ही महत्वाची शहरे व खेड्याकडे जाणारी मोठी वाहतूक असते त्यामुळे हा भागात नेहमी वर्दळ असते त्यामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले असून पुणतांबा चौफुली येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या मध्यभागी एखाद्या सामाजिक संस्थेच्या मदतीने चौक उभा करून दिशा दर्शक फलक, स्पीड ब्रेकर, रिप्लेक्टर तसेच सिग्नल उभा करावा त्यामुळे अनेक निष्पाप नागरिकांचे जीव वाचतील असे या प्रसिद्धी पत्रकाद्वारे मागणी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *