
कोपरगाव प्रतिनिधी:-
ऑगस्ट 2022 मध्ये होणाऱ्या “हेल्पिंग हँड्स”या संस्थेच्या कार्यक्रमामध्ये मागील वर्षी मदत केलेल्या व पुढे शिक्षण चालू असणाऱ्या 11 विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी त्यांचे मेस अथवा हॉस्टेल फी भरण्यासाठी प्रत्येकी रुपये 20000/- ची मदत करणार आहोत.तसेच जून 2022 मे बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 75 टक्क्यांपेक्षा जास्त मार्कस असणाऱ्या गरीब ,होतकरू , हुशार विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी रुपये 20000 प्रत्येकी या प्रमाणे 20 विद्यार्थ्यांना चार लाखाची मदत केली जाणार.तसेच दहावी किंवा बारावीची परीक्षा 60 टक्के पेक्षा जास्त मार्कांनी उत्तीर्ण झालेल्या व व्यवसायिक अभ्यासक्रम पूर्ण करून पुढील शिक्षण कमवा व शिका या माध्यमातून पुढे पूर्ण करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्षाच्या कालावधीसाठी रुपये पाच हजार याप्रमाणे आपण 26 विद्यार्थ्यांना एक लाख तीस हजाराची मदत करणार आहोत. गरीब , होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेच्या वेबसाइटवरून फार्म डाऊनलोड करून आवश्यक कागदपत्रांसह स्कॅन करून संस्थेच्या ईमेल पत्त्यावर पाठवावे.आपल्या संस्थेच्या मदतीच्या अटी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मदत दिली जाईल.अशी माहिती अध्यक्ष सीए.दत्ता खेमनर यांनी दिली आहे.आज पर्यत अनेक विद्यार्थांना या संस्थेच्या माध्यमातून मदत झाली आहे.
आपल्या माहितीतील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत सदर मेसेज पाठवण्याची विनंती आहे.
संस्थेची वेबसाईट-www.helpinghandsngo.net
Email- helpinghandskop@gmail.com
आपला स्नेहांकित
सीए.दत्ता खेमनर
अध्यक्ष,”हेल्पिंग हँड्स”
कोपरगाव.
