Uncategorized

कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन साजरा; स्व. अजितदादांचा विचार घेऊन पक्ष पुढे नेण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार…

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर-
देशातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन कोपरगाव येथे राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अशोकराव काळे यांनी पक्षाचा ध्वज फडकावून उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मतदारसंघातील पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते एकत्र आले होते.

यावेळी माजी आमदार अशोकराव काळे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले कि, स्व. अजितदादा पवार यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्याची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कधीही न भरून निघणारी खूप मोठी हानी झाली आहे. हा धक्का पक्षासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी अत्यंत मोठा आहे. परंतु अशा कठीण प्रसंगात आपण सगळ्यांनी खचून न जाता राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नेहमीच शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा पक्ष आहे. राज्याला प्रगतीच्या दिशेने झपाट्याने पुढे नेण्यासाठी आणि तळागाळातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हा स्व. अजितदादा पवार यांचा विचार होता. हाच विचार घेऊन राष्ट्रवादी पक्ष पुढील वाटचाल करीत आहे.

महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि राज्याच्या विकासाची गती कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होणे अत्यंत महत्वाचे असल्याने उपस्थित सर्वांनी उपमुख्यमंत्री ना. सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक बळकट करण्याचा संकल्प केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, सुनिल गंगुले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शशिकांत देवकर, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा सौ. वैशाली आभाळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे, प्रशांत घुले, श्रावण आसणे, विष्णुआबा शिंदे, गौतम सहकारी बँकेचे चेअरमन संजय आगवण, व्हा. चेअरमन विजय रक्ताटे, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचे व्हा. चेअरमन रावसाहेब चौधरी, संचालक रायभान रोहोम, बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे, राजेंद्र निकोले, रामदास केकाण, नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, हाजी मेहमूद सय्यद, जनार्दन कदम, संदिप कपिले, विजय त्रिभुवन, शैलेश साबळे, वाल्मिक लहिरे, राहुल शिरसाठ, बाळासाहेब रुईकर, माजी नगरसेवक विरेन बोरावके, रमेश गवळी, अजीज शेख, शिवाजी खांडेकर, दिनकर खरे, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक अनिल वल्टे, डॉ. चंद्रशेखर आव्हाड राहुल सोनवणे, पंकज पुंगळ, विजय रक्ताटे, नवाज कुरेशी, अनिल महाले, गणेश भोकरे, विक्रम सिनगर, दादासाहेब साबळे, नानासाहेब चौधरी, राजेंद्र जाधव, दादासाहेब दवंगे, काकासाहेब शिंदे, भाऊसाहेब भाबड, दादासाहेब बनसोडे, विठ्ठल पाठक, लक्ष्मण ठोंबरे, संजय महाले, मारुतीराव चौधरी, डॉ. तुषार गलांडे, शुभम लासुरे, मुकुंद इंगळे, सचिन गवारे, सुनिल फंड, सागर आहेर, शुभम काळे, मुकुंद भूतडा, मनोज नरोडे, सचिन परदेशी, राजेंद्र आभाळे, जावेद शेख, रहेमान कुरेशी, चंद्रकांत धोत्रे, अमित आगलावे, मनोज कडू, हारुण शेख, सागर फडे, मयुरेश शिंदे, संदिप देवळालीकर, माणिक जाधव, नितीन शेलार, हर्षल जैस्वाल, सागर विदुर, अमजद शेख, प्रदीप कुऱ्हाडे, राजेंद्र उशिरे, गणेश गोसावी, विनोद गलांडे, शिवाजी लकारे, भाईजित पठाण, राजेंद्र पगारे, गणेश घुमे, विशाल जगताप, वैभव कानडे, सचिन बागल आदींसह राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *