
कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी फॅक्टरी):-
प्रहार जनशक्ती पक्षाच्या देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी पदाधिकाऱ्यांची दि.१० जून रोजी सायं. ०६.०० वा. राहुरी फॅक्टरी येथे बैठक संपन्न झाली असल्याची माहिती देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष विजय कुमावत यांनी दिली.
प्रहारचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष विजय कुमावत यांचे सह राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष शरद वाळुंज, देवळाली प्रवरा महिला शहर अधक्ष्या भाग्यश्रीताई कदम, राहुरी फॅक्टरी महिला शहर अध्यक्ष रजनीताई कांबळे, देवळाली महिला शहर उपाध्यक्ष सुरेखा पंडित, उपाध्यक्ष अबिद शेख, उपाध्यक्ष शिवाजी मुसमाडे, ओंकार मुसमाडे, अंबिकानगर शाखा अध्यक्ष अमोल अंबिलवादे, राहुरी फॅक्टरी शहर उपाध्यक्ष एकनाथ वाणी, उपाध्यक्ष गणेश भालके, मार्गदर्शक सुनील कदम, प्रभाकर कांबळे, राहुरी फॅक्टरी महिला शहर उपाध्यक्ष अफसाना सय्यद, वंदना कांबळे, लैला शेख, प्रसादनगर शाखा अध्यक्ष अमोल साळवे, उपाध्यक्ष सनी सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना कुमावत यांनी सांगितले की, रविवार दि. १२ जून रोजी श्रीरामपूर येथे प्रहार जनशक्ती पक्षाची होणार असलेली आढावा बैठक, सर्व पदाधिकार्यांच्या कामाचा आढावा व देवळाली प्रवरा नगरपालिकेची जाहीर झालेली प्रभाग रचना आदी विषयावर मुख्यत्वे चर्चा झाली.
