
कोपरगाव प्रतिनीधी:-
चासनळी येथील के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा १२ वी चा निकाल१०० टक्के लागला आहे. पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एप्रिल२०२२ मध्ये घेतलेल्या १२वी परीक्षेचा निकाल नुकताच इंटरनेटवर जाहीर झाला असून के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. इ.१२वी विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून कुमारी संधान दिपीका कचरू८३.८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तर कुमार कटारे सार्थक राजेंद्र ८१.३३ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तसेच कुमार जाधव मयूर प्रकाश ७८.५० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. कुमारी गाढे करीना भारत या विद्यार्थिनीस भूगोल विषयात ९४ गुण मिळवून यशस्वी झाली आहे व मराठी विषयात कुमारी आवारे साक्षी संतोष या विद्यार्थिनीस ९२ गुण मिळाले आहेत. तसेच वाणिज्य शाखेचा निकालही १०० टक्के लागला असून कुमारी गावंड गायत्री संजय ७८.८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तर कुमारी नाजगड सरिता मारुती ७८.६७ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तसेच कुमारी वाघ जयश्री उत्तम ७६ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तसेच कुमार जगदाळे आदित्य अरुण या विद्यार्थ्याला पुस्तपालन आणि लेखाकर्म या विषयात ९५ गुण मिळवून विषयात प्रथम आलेला आहे.


यशस्वी विद्यार्थ्यांचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.अशोकराव रोहमारे, सचिव. संजीव कुलकर्णी, श्री.चंद्रशेखर कुलकर्णी, श्री.संदीपराव रोहमारे, श्री. सुजित रोहमारे ,प्राचार्य. डॉ. बी. एस. यादव, श्री. सचिन चांदगुडे, श्री. मनीष गाडे श्री. रामभाऊ गाडे,. डॉ. विकास जामदार,चासनळी महाविदयालयाचे प्राचार्य .एन. जी .बारे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
