

कोपरगाव प्रतिनिधी:-
श्री.साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने श्री गुरुस्थान मंदिरासमोर होळी पेटविण्यात आली. यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते होळीची विधीवत पुजा करण्यात आली. याप्रसंगी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब शिंदे, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ.आकाश किसवे, दिलिप उगले, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी व मंदिर पुजारी उपस्थित होते.


