
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव विजय कापसे दि ८ जुन २०२२-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इ १२ वी परीक्षेचा निकाल नुकताच मंडळाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित झाला असून यात कमलाताई बाळासाहेब सातभाई तांत्रिक जुनियर कॉलेजच्या किमान कौशल्य विभागाचा निकाल १०० टक्के तर विज्ञान शाखेचा निकाल देखील १०० टक्के लागला आहे.
यात इ १२ वी किमान कौशल्य विभागात प्रथम क्रमांक शीतल बाबासाहेब आहेर (७४.६७ ) द्वितीय क्रमांक यशोदा बाबुराव खाटीक (७३.५० ) तृतीय क्रमांक सुचित्रा सदाशिव आहेर (७३.१७ ) यांनी मिळवला आहे तसेच विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक गौरव जालिंदर संवत्सरकर ( ६८.६७) द्वितीय क्रमांक अनिता भगवान शिंदे (६५.३३ ) तृतीय क्रमांक स्वाती विलास जिरे (६५.१७ ) गुण मिळवत विशेष यश संपादन केले आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, माजी नगराध्यक्षा ऐश्वर्या सातभाई, संस्थाप्रमुख परशराम साबळे, सचिव सुचित्रा साबळे, प्राचार्य विशाल धारणगावकर, रजीस्टार बापू डांगे, प्रा. विजय कापसे, प्रा. विजय जाधव, प्रा. विलास चव्हाण, प्रा. सोनाली कापसे, निलेश देवकर, राजेंद्र आहेर आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह आजी-माजी विद्यार्थी- विद्यार्थिनीनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.
चौकट:-
विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रक शुक्रवार दि १७ जून रोजी आप-आपल्या महाविद्यालयात दुपारी ३ वाजता मिळेल.
