
कोपरगाव प्रतिनीधी:-
तालुक्यातील वारी येथील आंबिका सहकारी सोसायटीची निवडणूक माजी सभापती मच्छिंद्र टेके यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. बी. क्षीरसागर यांनी काम पाहिले. नव निर्वाचित संचालकांचे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले.
या निवडणुकीत संचालक म्हणून माजी सभापती मच्छिंद्र टेके, वसंतराव गोरे, रवींद्र गोर्डे, जयेश वालझाडे, दत्तात्रय ठोंबरे, दिलीप टेके, ललिता नानासाहेब टेके, मच्छिद्र टिक्कल, वाल्मिक भाकरे, बाळासाहेब आवारे, रंजना अनिल गोरे, सविता बाबासाहेब टिक्कल, सुभाष डहारे यांची बिनविरोध निवड झाली.
माजी सभापती मच्छिंद्र टेके म्हणाले की, सभासदांनी बिनविरोध निवडणुकीसाठी दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी काम करू. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सहकारी बँकेच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष पुढाकार घेऊ.
