तहसील व पंचायत समिती इमारतीवर सोलर प्लॅन्ट बसवा:- ना. आशुतोष काळे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या तहसील कार्यालय व पंचायत समितीवर इमारतीवर सोलर प्लॅन्ट बसवा अशी मागणी नुकतीच श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांची भेट घेवून त्यांना या बाबत निवेदन दिले आहे.
कोपरगाव तालुक्यातील नागरिकांचा पंचायत समिती व तहसील कार्यालयात विविध कामानिनित्त नेहमी वर्दळ असते. या दोनही कार्यालयांना महिन्याकाठी मोठ्या स्वरुपात वीजबिल येते. दिवसेंदिवस या वीज बिलामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे महसूल व ग्राम विकास विभागाचा वीज बिलापोटी मोठा आर्थिक खर्च होत आहे.
तहसीलदार कार्यालय व पंचायत समिती इमारतीवर सोलर प्लॅन्ट बसविल्यास निश्चितच हा आर्थिक खर्च कमी होण्यास मदत होवून त्यातून वाचणारी रक्कम इतर सोयीसुविधांसाठी वापरली जाईल. यासाठी तहसील कार्यालय व पंचायत समितीवर इमारतीवर सोलर प्लॅन्ट बसवावे अशी मागणी ना. आशुतोष काळे यांनी निवेदनाच्या माध्यमातून पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. याबाबत पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

फोटो ओळ:- तहसील कार्यालय व पंचायत समितीवर इमारतीवर सोलर प्लॅन्ट बसवावे याबाबत ना. हसन मुश्रीफ यांना निवेदन देतांना ना. आशुतोष काळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *