श्री निऱ्हाळी सर यांचा समाजातील सर्व स्तरातील वर्गासाठी प्रेरणादायी असा उपक्रम…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
संगमनेर प्रतिनिधी:-
बी.जी.पी. सह्याद्री महविद्यालय व सह्याद्री जूनियर कॉलेज चे माजी प्राचार्य श्री विजय मुरलीधर निऱ्हाळी सर यांच्या ७५ वा वाढदिवस कालिकामाता मंदिर , संगमनेर येथे संपन्न झाला . या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे साहेब, संगमनेर च्या प्रथम महिला नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे उपस्थित होते.
श्री विजय मुरलीधर निऱ्हाळी सर यांनी दिव्यांग विद्यार्थांच्या प्रति आपली सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांच्या वजना इतका तुला भार करून वह्या व चित्रकलेचे साहित्याचे वाटप संग्राम निवासी मूकबधिर विद्यालय व डॉक्टर देवेंद्र ओहरा निवासी मतिमंद विद्यालया भेट स्वरूपात दिल्या.
हा उपक्रम समाजातील सर्व स्तरातील वर्गासाठी प्रेरणादायी असा आहे श्री निऱ्हाळी सर यांना ७५ व्या वाढदिवसाच्या दिव्यांग विद्यार्थी व दोन्ही शाळे कडून अनेक शुभेच्छा व यापुढे असेच उपक्रम राबविण्याची शक्ती व प्रेरणा त्यांना ईश्वर देवो हीच सदिच्छा धन्यवाद पूर्वक. या कार्यक्रमा प्रसंगी संग्राम निवासी मुकबधिर विद्यालायचे सामाजिक कार्यकर्ता श्री. आनंद अल्ले सर व वाचा उपचार तज्ञ श्री. समीर शिंदे सर उपस्थिती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *