जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांच्या वाढदिवस विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(नाशिक):-
नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. नाशिक जिल्ह्यात घेण्यात आलेल्या विविध समाजोपयोगी कार्यक्रमांमध्ये आरोग्य शिबिरे, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, आधारतीर्थ अनाथ आश्रमात भोजन, विशेष विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात धान्य वाटप, कपडे वाटप, चित्रकला स्पर्धा, शासकीय रुग्णालयात फळे वाटप, अनाथाश्रमात मोफत औषधे वाटप, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण यांसह विविध उपक्रमांनी साजरा झाला.


राष्ट्रवादी भवन येथील सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ना.नरहरी झिरवाळ यांनी पुष्पगुच्छ देऊन अॅड.रविंद्र पगार यांचे अभीष्टचिंतन केले.

नाशिक तालुक्यातील मखमलाबाद येथील जलाराम निवासी मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना किराणा वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे शहराध्यक्ष शंकर पिंगळे, मोतीराम पिंगळे, ऋषिकेश पिंगळे, नितीन पिंगळे, विद्यालयाचे अध्यक्ष विश्वास अहिरे, धनंजय काकड, अविनाश पिंगळे, तन्मय सुगंधी, सौरभ जाधव, गणेश शिंपी, प्रतिक पिंगळे आदी उपस्थित होते.


निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळा बनकर, जिल्हा उपाध्यक्ष सचिन पवार, दिपक बनकर, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा वृषाली कदम, डॉ. योगेश धनवटे, संकेत जाधव, यश बनकर, विष्णू मोगल, चेतन खैरे आदी उपस्थित होते.
निफाड तालुक्यातील विंचूर येथील संत जनार्दन स्वामी अनाथ आश्रम येथे मोफत औषधे वाटप करण्यात आले. यावेळी सोहिल मोमीन, इस्माईल मोमीन, आत्माराम दरेकर, सचिन दरेकर, सुनिल जेऊघाले आदी उपस्थित होते.


त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आधारतीर्थ अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने भोजन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, शहराध्यक्ष मनोज कान्नव, तालुकाध्यक्ष कैलास मोरे, अनिल काळे, संतोष पाटील, योगेश खोडे, जितु झोले आदी उपस्थित होते.
मालेगाव येथे भव्य चित्रकला स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. या चित्रकला स्पर्धेसाठी शरद पवार यांचे चित्र रेखाटणे असा विषय देण्यात आला आहे. यात रोख रक्कमेची पारितोषिके ठेवण्यात आली आहे. स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोजक जयेश अहिरे यांनी सांगितले आहे.
नाशिक येथील नांदूर नाका परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी माहिती तंत्रज्ञान सेलचे जिल्हाध्यक्ष संकेत निमसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नाना साबळे आदी उपस्थित होते.
चांदवड तालुक्यातील माध्यमिक विद्यालय दरसवाडी येथील विद्यार्थांना शालेय साहित्य व मिठाई वाटप करण्यात आले. यावेळी राष्टवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्ता वाघचौरे, पदाधिकारी शैलेश ठाकरे, रमेश वाघचौरे, सरपंच आर.डी.थोरात, ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष संदीप थोरात, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोपान कांगुणे, रावसाहेब चव्हाण, देविदास कर्पे, अमोल डोंगरे, केशव चव्हाण आदी उपस्थित होते. तसेच सोनीसांगवी येथे अनाथ मुलांना मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी सचिन ठाकरे, माधव ठाकरे, सोमनाथ पवार, वसंत गांगुर्डे आदी उपस्थित होते.
दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. यावेळी कादवा साखर कारखान्याचे संचालक शहाजी सोमवंशी, संदीप गोतरणे, जेष्ठ नेते दिलीप सोमवंशी, सौरभ पाटील, सुधाकर सोमवंशी, भाऊराव देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ.चोपडे, वैद्यकीय पर्यवेक्षक डॉ.पांडे, आरोग्य सेविका मंगल कळमकर, प्रीती देशमुख, लता परब, मधुकर फुगट, लक्ष्मण देशमुख आदी उपस्थित होते.
बागलाण तालुक्यातील नामपूर येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळे वाटत करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष नामदेव सावंत, युवक शहराध्यक्ष मेघदीप सावंत, सम्राट काकडे, चारुदत्त खैरनार, डी.एस.भामरे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी भवन येथील सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ना.नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश गोसावी, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पवार, महेश भामरे, तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, गोकुळ बत्तासे, उमेश खातळे, सोमनाथ खातळे, प्रशांत पाटील, गणेश गायधनी, नितीन मोहिते, दत्ता कुवर, योगराज रौंदळे, रोहिदास गोवर्धने, अशोक मुरकुटे, प्रशांत बच्छाव, अमोल नाईक, मुकुंद फडोळ, आनंद ढिरींगे, विलास सानप, मुकेश शेवाळे, सोहिल मोमीन, इस्माईल मोमीन, जगदीश पवार, योगेश देवरगावकर, महेश कोरडे, भूषण शिंदे, प्रथमेश पवार, संदीप अहिरे, जितेंद्र पगार, योगिता आहेर, रुपाली पठारे आदींनी शुभेच्छा दिल्या.

फोटो ओळी:- राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांचे अभीष्टचिंतन करतांना विधानसभेचे अध्यक्ष ना.नरहरी झिरवाळ. समवेत पुरुषोत्तम कडलग, डॉ.योगेश गोसावी, राजेंद्र जाधव, विजय पवार, भास्कर भगरे, उमेश खातळे, सोमनाथ खातळे, गणेश गायधनी, नितीन मोहिते, विलास सानप, जगदीश पवार, संदीप अहिरे आदी दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *