कोपरगाव नगर परिषद हद्दीतील सर्व पक्षीय दिव्यांग पदाधिकाऱ्यांची मुख्याधिकारी शांताराम गोसावी साहेबांसोबत बैठक संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव नगर परिषद हद्दीतील सर्व पक्षीय दिव्यांग पदाधिकाऱ्यांची मुख्याधिकारी साहेबांसोबत बैठक संपन्न बुधवार दिनांक १२/०४/२०२२ रोजी ११वा. कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सन्माननीय श्री गोसावी साहेब यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या सर्वपक्षीय दिव्यांग पदाधिकाऱ्यांची बैठक अतिशय समाधान कारक चर्चा होऊन व सन्माननीय मुख्याधिकारी साहेब यांच्या मनात दिव्यांगा प्रति असलेल्या विविध योजनांचे अतिशय उत्तम व्हिजन त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितले व त्यावरही चर्चा झाली तसेच कोपरगाव नगर परिषद हद्दीतील दिव्यांग बंधू भगिनींचे प्रश्न अतिशय उत्तम प्रकारे सोडवण्यासाठी कायमस्वरूपी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची एक शहर कमिटी करण्याचे श्री मुख्याधिकारी साहेब यांनी यावेळी सांगितले आहे तसेच सन्माननीय मुख्याधिकारी श्री गोसावी साहेबांचा सर्वपक्षीय दिव्यांग पदाधिकार्‍यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी श्री विरेनजी बोरावके श्री राजेंद्रजी वाकचौरे माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी योगेश गंगवाल जिल्हाध्यक्ष मनसे दिव्यांग सेना बाळासाहेब लांडे उपजिल्हाध्यक्ष शिवसेना दिव्यांग सेल स्वप्नील कडू शहराध्यक्ष भाजप दिव्यांग सेल जयवंतराव मरसाळे अध्यक्ष कोपरगाव अपंग संघटना प्रवीण भुजाडे शहराध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटना संदीप कवडे शहर सचिव प्रहार दिव्यांग संघटना अफजल पठाण शहराध्यक्ष शिवसेना दिव्यांग सेल संजय घाडगे उपशहर अध्यक्ष भाजप दिव्यांग सेल प्रशांत चिमनपुरे आदित्य निकुंभ आदी सर्वपक्षीय दिव्यांग पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *