अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ सर्व शक्तीनिशी साकरवाडीच्या कामगारांच्या पाठीशी:- मिलिंदजी तुळस्कर…

Uncategorized

कामगार सहकारी पतपेढी चा ६७ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील वारी-साकरवाडी येथील सोमैय्या उद्योग समुहाच्या दि गोदावरी बायोरिफायणारीज लिमिटेड साकरवाडी येथील कामगार संघटनेच्या कामगार सहकारी पतपेढी या संस्थेचा ६७ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला


जेष्ठ कामगार नेते कै साथी किशोर पवार हे संस्थेचे संस्थापक असुन कामगारांच्या आर्थिक प्रगतीमध्ये या संस्थेचा मोलाचा वाटा आहे गत निवडणुकीत संस्थेत सत्ता बदल करीत अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ या कामगार संघटनेने संस्थेवर वर्चस्व स्थापन करून संस्थेची कर्ज वितरण मर्यादा दोन लाखापर्यंत वाढवली असुन सध्या संस्थेची उलाढाल ४ कोटींची आहे
यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष मिलिंदजी तुळस्कर ,सरचिटणीस सुहासजी माटे, उपाध्यक्ष प्रशांतजी वर्तक व विनोद गोगळे हे मुंबईतील कामगार नेते उपस्थित होते यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांचा तसेच गोदावरी बायोरिफायणरीज लिमिटेड साकरवाडीचे डायरेक्टर सुहास गोडगेसाहेब ,सचिन टेके यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सभापती मच्छिद्र टेके होते कार्यक्रमाचे प्रास्तविक कामगार प्रतिनिधी सचिन टेके यांनी केले तर आभार व सुत्र संचालन माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे यांनी केले
यावेळी कामगार महेश चव्हाण, दिलीप देशमुख यांनी कामगारांच्या समस्या मांडल्या
तर वारीचे माजी सरपंच रावसाहेब टेके, मच्छिद्र टेके,सरचिटणीस सुहास माटेसाहेब,सुहास गोडगेसाहेब,अशोक कानडे आदींनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संघटनेचे अध्यक्ष मिलिंदजी तुळस्कर यांनी बोलतांना अनेक अनुभव सांगितले रेल्वे पतपेढीने
४०० कोटींचा टप्प्या आमच्या काळातच पार केल्याचे सांगताना कामगार युनियनमध्ये विविध पदांवर ४० वर्षांहून अधिक काळ मी कामगार चळवळीत खर्च केला आहे त्यामुळे न्याय मिळवुन देण्यासाठी माझ्याकडे प्रदीर्घ अनुभव असुन आपली संघटना सर्व शक्तीनिशी साकरवाडीच्या कामगारांच्या पाठीशी उभी असल्याचे सांगत कामगारांच्या प्रश्नात लक्ष घालुन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले
गोदावरी बायोरिफायणारीचे डायरेक्टर सुहास गोडगे साहेब हे एक चांगली व्यक्ती असल्याचे मी नजरेने ओळखलं असे सांगुन गोडगे यांच्या कार्य कुशलतेचे त्यांनी कौतुक केले संस्थेच्या संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयांचे देखील कौतुक करत तुळस्कर यांनी संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या
यावेळी वारी ग्रामपंचाय तीचे उपसरपंच विशाल गोर्डे,सदस्य प्रकाश गोर्डे,अनिल गोरे,राहुल शिंदे,सुवर्णा गजभिव यांचे सह ग्रामस्थ तसेच संघटनेचे
अध्यक्ष नारायण वाळुंज, उपाध्यक्ष गौतम मोरे, कामगार सहकारी पतपेढीचे अशोक गजभिवं, संचालक महेश वालझडे,शेखनुर शेख, वाहेदखान पठाण ,विलास दाभाडे, अनिल निकम, अनिल सिंग, दत्ता शेलार, भगवान हुसळे, मधुकर मोरे, संतोष जगताप, राजपाल रजपूत,अधिकारी बी पी पाटील, जी के टेके, गणेश पाटील संस्थचे सचिव अक्षय हासे,अविनाश भारूड,मदतनीस लखन सोनवणे,हरीभाउ टेके ,बाबु देशमुख यांचे सह अधिकारी कर्मचारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *