मळेगावथडी सोसायटीच्या निवडणुकीत कोल्हे गटाचा दणदणीत विजय…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
तालुक्यातील मळेगांवथडी सहकारी सोसायटीच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेकदादा कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हे गटाने सर्वच्या सर्व तेरा जागा जिंकून काळे गटाचा दारुण पराभव केला आहे. नवनिर्वाचित उमेदवारांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तालुका सह निबंधक एन. जी. ठोंबळ तर सहायक म्हणून सचिव शिवाजीराव दवंगे यांनी काम पाहिले.
विजयी उमेदवारामध्ये सर्वश्री. रमेश उगले (५५६), अशोक गाडे (५७०), सचिन चंद्रे (५४३) बाजीराव दवंगे (५८१) शांताराम दवंगे (५७७), संतोष दवंगे (५७९), धनंजय बडदे (५६७), सुकदेव शिंदे (५४१), भाऊराव माळी (५८७), इंदुबाई कांतीलाल खोंड (६०३) कमलबाई आबासाहेब दवंगे (५९१), अनंत दवंगे (५५१), गोकुळ मोरे (५८८) यांचा समावेश आहे. विरोधी काळे गटाच्या सर्व उमेदवारांचा सुमारे अडीचशे मताच्या फरकाने पराभव झाला. या चूरशीच्या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी संजीवनी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सखाहरी उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच अनिता किरण उगले, उपसरपंच मुकेश चंद्रे, राजकुमार दवंगे, सुधाकर चंद्रे, शिवाजी उगले, बापूसाहेब खोंड आदींनी विशेष परिश्रम घेतले. सर्व उमेदवारांचे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आणासाहेब दवंगे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम शहराध्यक्ष दत्ता काले, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, शहराध्यक्ष अविनाश पाठक आदींनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *