वडगाव शनेश्वर सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे सुभाष कांगणे तर उपाध्यक्षपदी दौलत सोनवणे यांची बिनविरोध निवड…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यातील वडगाव येथील शनेश्वर सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे सुभाष बारकु कांगणे तर उपाध्यक्षपदी दौलत बाबुराव सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल त्यांचे जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी अभिनंदन केले.
या सोसायटीत कोल्हे गटाचे स्पष्ट बहु‌मत आहे. या निवडीप्रसंगी संचालक सर्वश्री विश्वनाथ बारगळ, सखाहरी सोनवणे, रमेश कांगणे, सावित्रीबाई बारगळ, जानकाबाई आंधळे, सुकदेव सोनवणे, खंडेराव सोनवणे, मच्छिंद्र बारगळ, भीमराज सोनवणे हे उपस्थीत होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला, सत्कारास उत्तर देताना अध्यक्ष सुभाष कांगणे म्हणाले की, स्व. शंकरराव कोल्हे यांनी वडगाव येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी वडगावच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी मिळवून दिला. शेतकऱ्यांच्या अडचणीवर उपाययोजना केल्या. याप्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे संघटक संदिप बारगळ, उत्तमराव पायमोडे यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत मोठ्या संख्येने उपस्थित होते. विश्वनाथ बारगळ यांनी सूत्रसंचालन केले, शेवटी सचिव अण्णासाहेब निकम यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *