कोपरगावच्या नागरिकांना शंभूगर्जना पुरस्कार समर्पित:- विवेकभैय्या कोल्हे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीच्या वतीने मिळालेल्या शंभूगर्जना पुरस्काराने स्फूर्ती मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली व ते स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांनी अनेक यशस्वी लढाया केल्या. स्वाभिमान काय असतो हे क्रूर औरंगजेबाला त्यांनी दाखवून दिले. त्यांचीच प्रेरणा घेऊन आपण काम करत आहोत. मिळालेला पुरस्कार कोपरगाव तालुक्यातील नागरिकांसाठी समर्पित करत आहे असे प्रतिपादन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील विविध गावातील कार्यकर्त्यांनी मिळालेल्या पुरस्काराबद्दल विवेक कोल्हे यांच्यावर प्रत्यक्ष भेट घेऊन अभिनंदनाचा वर्षाव केला. त्यांनी केलेल्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना कार्यस्थळावर जेऊरकुंभारीचे सरपंच सुवर्णा पवार यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत‌ कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक, माजी सभापती शिवाजीराव वक्ते, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब वक्ते, मधुकर वक्ते, विठ्ठलराव आव्हाड, रीपाईचे नेते दिपकराव गायकवाड,सतिष आव्हाड, उपसरपंच यशवंत आव्हाड, सदस्य प्रदीप गायकवाड, भाऊसाहेब वक्ते, संजय लकारे, संजय भोंगळे, संजय वक्ते ,सुमित पगारे, दिनकर भाबड, सतीश पवार अदी उपस्थित होते. यावेळी यशवंत आव्हाड म्हणाले की विवेक कोल्हे यांना मिळालेला हा पुरस्कार तालुक्यातील तरुणांना प्रेरणा देणारे ठरेल. विविध क्षेत्रात विवेक कोल्हे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. कोविड सेंटरच्या माध्यमातून त्यांनी मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली.तर सर्वधर्मीय विवाह सोहळा घेऊन त्यांनी सामाजिक जबाबदारी काय असते हे सिद्ध केले आहे.त्यांना मिळालेला पुरस्काराचा अभिमान असल्याचेही ते म्हणाले. सूत्रसंचालन माजी संचालक बाळासाहेब वक्ते यांनी केले तर आभार भाऊसाहेब वक्ते यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *