
कोपरगाव प्रतिनिधी:-
तालुक्यातील सोनारी सहकारी सोसायटीची पंचवार्षीक निवडणुक नुकतीच बिनविरोध झाली असुन त्यात कोल्हे गटाचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडुन आले आहेत. जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सोनारी सोसायटीची निवडणुक बिनविरोध पार पडली.
बिनविरोध निवडलेल्या संचालकामध्ये सर्वश्री. धोंडीबा सांगळे, माधवराव सांगळे, दत्तु सांगळे, संपतराव आव्हाड, वसंतराव सांगळे, अर्जुन सोनवणे, मोहनराव सांगळे, लताबाई विठठल गिते, मनोज सांगळे, अंजनाबाई आघाव, हिराबाई काशिनाथ आव्हाड, सयाजी रणशुर यांचा समावेश आहे.
हि निवडणुक बिनविरोध पार पडण्यासाठी सर्वश्री. बद्रीनाथ सांगळे, अनिल सांगळे, नंदु सांगळे, गणेश आव्हाड, विनोद सोनवणे, गंगाधर सांगळे, आप्पासाहेब सांगळे, पंढरीनाथ सांगळे, जयराम सांगळे यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व नवनिर्वाचित उमेदवारांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.
