देवळाली प्रवरा शहरात क्रिडा संकुल उभारावे:- मेडीकल हेल्प टिमची मागणी…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
देवळाली प्रवरा शहराचा विस्तार खुप मोठा आहे आणि देवळाली प्रवरा शहरात व्यायामशाळा आणि क्रिडांगण यांची वाणवा आहे उदयाचे तरुणांचे उज्वल भविष्य लक्षात घेता नगर परीषदेने शहरात सर्व सोयी नी युक्त क्रिडा संकुल उभारावे
व्यायामशाळेत अद्यावत साहीत्य उपलब्ध करुन पूर्णवेळ प्रशिक्षक नेमणुक करावी खुल्या व्यायामशाळा वाड्या वस्तीवर उभाराव्यात तसेच नगर परीषद चषक या नावाने मैदानी खेळांच्या स्पर्धा आयोजित कराव्यात अशा मागणीचे निवेदन देवळाली प्रवरा नगर परीषदेचे मुख्याधिकारी मा अजित निकत साहेब यांचेकडे देवळाली प्रवरा मेडीकल हेल्प चे वतीने देण्यात आले.
या प्रसंगी मा सनदी अधिकारी दत्ता कडू पाटील, आतंरराष्ट्रीय खेळाडू अप्पासाहेब ढुस, प्रशांत कराळे , ऋषीकेश संसारे, प्रशांत काळे , विवेक मुसमाडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *