श्री.क्षेत्र कोकमठाण येथे ब्रम्हलिन संत रामदासीबाबांच्या ३२व्या पुण्यतिथी सोहळ्याचा बुधवारी प्रारंभ..!!

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
समर्थ रामदास स्वामींनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना १६७८ मध्ये सनद देवुन काही गांवे इनाम म्हणून दिली होती त्याची प्रत लंडनच्या ग्रंथालयातुन इतिहास संशोधक संकेत कुलकर्णी यांनी २०१७ मध्ये शोधुन काढली तेंव्हा युवकांनी समर्थाबरोबरच, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या विषयीचे वाचन सतत संग्रही ठेवावे आणि ब्रम्हलिन संत रामदासी बाबा यांची संस्कारप्रेरणा आत्मसात करावी असे प्रतिपादन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी वैजापुर आश्रमाचे प्रमुख दत्तगिरी महाराज यांनी केले. अध्यक्षस्थानी हभप. रामदास वाघ होते.
तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथे ब्रम्हलिन संत रामदासीबाबाच्या ३२ व्या पुण्यतिथी सोहळयाचा प्रारंभ बुधवारी ज्ञानेश्वरी ग्रंथ व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पुजनाने करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी रामदासीबाबा भक्त मंडळाचे शरदनाना थोरात व कोकमठाण गांवक-यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी सर्वश्री सुरेश भिडे, अशोक टेके, रमेश वाघ, शिवाजी लोहकणे, आप्पासाहेब लोहकणे, हरिभाउ लोहकणे, वाल्मीक बिडवे, विलास कुलकर्णी, जालिंदर निखाडे, गोरख चव्हाण, सुकदेव वाघ, रामभाउ महाजन, अरूण पगारे, बाळासाहेब जाधव, सुभाष जाधव, कमलाकर भालेराव, व्यासपिठ चालक ह.भ.प. तुकाराम महाराज वेलजाळे यांच्यासह पंचकोशीतील सर्व भजनी मंडळी, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, भक्तगण मोठया संख्येने उपस्थित होते. पौरोहित्य सोमनाथ जोशी यांनी केले. पुण्यतिथीच्या औचित्याबरोबरच समाजप्रबोधानकर हभप सर्जेराव महाराज टेके यांच्या संतवाणीतुन शौर्यगाथा शिवरायांची कथा २५ जानेवारीपर्यंत सादर केली जाणार असुन २६ जानेवारी रोजी सरालाबेटाचे महंत रामगिरी महाराजांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता होत आहे.
ह.भ.प. दत्तगिरी पुढे म्हणाले की, कोपरगाव भूमि ऐतिहासिक व सत महताच्या पदस्पशनि पावन झालेली आहे. ब्रम्हलिन संत रामदासीबाबा उर्फ शंकर हरिभाउ कोल्हटकर यांनी भिलवाडी सांगलीतुन परमार्थ परिकमा सुरू करत त्याला दक्षिणगंगा काशि गोदावरी नदीकाठावरील कोकमठाण गांवी विसावा दिला. त्यांच्या हयातीत असंख्य मंदिरांचा जीर्णोध्दार करत साध्या राहणीमानातुन उच्च विचारांची पेरणी केली. त्यांचा वसा कोकमठाणसह पंचक्रोशीतील गावांनी जपला आहे. स्वातंत्र भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षात या संत महात्म्याची ३२ वी पुण्यतिथी तुम्ही आम्ही साजरी करतो आहोत हा योगायोग आहे. ब्रम्ह हेच सत्य असुन सज्जनगडवासिय समर्थ रामदास स्वामी अद्वैत विज्ञानवादी होते. हिंदवी स्वराज्याच्या भरभराटीसाठी छत्रपती शिवबांना त्यांचे पाठबळ होते. शेवटी व्यासपिठचालक ह.भ.प. तुकाराम महाराज वेलजाळे यांनी आभार मानले.

फोटोओळी:- कोपरगाव
श्री.क्षेत्र कोकमठाण येथे ब्रम्हलिन संत रामदासीबाबांच्या ३२ व्या पुण्यतिथी सोहळयाचा प्रारंभ बुधवारी राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचे शिष्य ह.भ.प. दत्तगिरी महाराज, भागवतानंदगिरी महाराज, रामदास महाराज वाघ यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथ व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पुजनाने झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *