कोपरगांव ग्रामिण सिमाक्षेत्रातील नागरी सुविधांसाठी १० कोटींचा निधी द्यावा:- सौ. स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
कोपरगांव नगरपालिका हददीत ग्रामिण भागातील मुर्शतपुर शिवरस्ता, आढाव वस्ती, शेख वस्ती, जुना टाकळी रोड, साबळे वस्ती, नरोडे वस्ती, कर्मवीरनगर, गोकुळनगरी, ओमनगर, कोपरगांव ब्रांच शाळा परिसर, द्वारकानगरी, कोपरेवस्ती, नविन टाकळी रोड, गवारेनगर, धोंडीबानगर, बागुल वस्ती, शेतकी फार्म, येवला रोड या नव्याने विस्तारलेल्या सिमाक्षेत्रातील नागरी सुविधांसाठी १० कोटी रूपयांचा निधी मिळावा याबाबतचे निवेदन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांची प्रत्यक्ष भेट घेवून दिले. निधी मिळेपर्यंत याभागात नागरी सुविधा प्राधान्याने पुरविण्यात याव्यात असेही त्या म्हणाल्या.
याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले, माधवराव आढाव नागरी बँकेचे अध्यक्ष विजय आढाव, कोपरगांव प्रगत सोसायटीचे अध्यक्ष वैभव गिरमे, प्रसाद आढाव उपस्थित होते.
सौ. स्नेहलता कोल्हे यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोपरगाव ग्रामिण भागात वर्षानुवर्षे येथील रहिवासी नागरी सुविधांपासुन वंचित आहे. त्यांच्यासाठी पिण्यांचे पाणी, रस्ता, वीज-दिवाबत्ती, सांडपाणी, गटार यासह नागरी सुविधांसाठी शासन निर्णय संकीर्ण २०१६ प्र. क्र. ४९-१- नवि १६ मंत्रालय मुंबई, दिनांक १८ मार्च २०१६ संकेतांक २०१६०३१८१७१२२६१५२५ अन्वये नव्याने विस्तारलेल्या सिमाक्षेत्रात नागरी सुविधा सहाय योजनेअंतर्गत १० कोटी रूपयांचा निधी उपलब्धतेसाठी नगरविकास विभागास प्रस्ताव सादर करून त्याची तात्काळ उपलब्धता करून मिळावी अशी मागणी केली असून जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी नगरपालिका प्रशासकीय विभागास याकामी आदेश देवुन कार्यवाही करावी म्हणून आश्वासीत केले आहे.

फोटोओळी:- कोपरगांव
कोपरगांव नगरपालिका हददीत ग्रामिण भागातील विस्तारलेल्या सिमाक्षेत्रातील नागरी सुविधांसाठी १० कोटी रूपयांचा निधी मिळावा याबाबतचे निवेदन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *