


कोपरगाव प्रतिनिधी:-
दि.३डिसेंबर २०२१
लायन्स मुक बधिर व अपंग विद्यालय, कोपरगाव.
आज विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक श्री.गुरसळ सर यांचे हस्ते डाॅ. हेलन केलर यांचे प्रतिमा पुजन करुन प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.सदर प्रसंगी विद्यालयाचे जेष्टदिव्यांग शिक्षक श्री शशीकांत शेळके यांचा सत्कार करण्यात आला.श्रीशेळके सर यांनी डाॅ. हेलन केलर यांचे जीवन चरिञावर माहिती दिली.तर श्रीनारायण डुकरे यांनी दिव्यांगांचे हक्क वकायदे या विषयी मार्गदर्शन केले.व दिव्यांगासाठीच्या विवीध योजनांची माहिती दिली.सदर कार्यक्रम D NEWS चे संपादक श्री शैलेषजी शिंदे व SG NEWS चे संपादकश्री.संतोषजी जाधव, सर्व दिव्यांग बांधव,शिक्षक वशिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते हा कार्यक्रम सर्व विद्यार्थी आॅनलाईन पाहात होते.
