

कोपरगाव प्रतिनिधी:-
राष्ट्रसंत सद्गुरु जनार्धन स्वामी महाराज (बेट) कोपरगाव ट्रस्ट च्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्धल श्री.विलास आबा जी कोते पाटील यांचा सत्कार माधवराव पाटील (सिव्हिल इंजिनियर) यांनी केला .

यावेळी श्रीराम इंडस्ट्री चे मालक विजयराव कडू पाटील, माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील हे उपस्थित होते. यावेळी विलास आबांचे वडील बाबाजींच्या परंम जुन्या काळातील शिष्य शिर्डी चे मारुतराव कोते पाटील, त्यांचे बंधू राजेंद्र काका कोते पाटील, शिर्डी चे प्रथम नगराध्यक्ष. कैलास बापू कोते पाटील हे ही उपस्थित होते. आबांच्या हातून बाबाजींच्या मनातील आश्रम, गुरुकुल (शाळा) जुन्याकाळातील प्रमाणे व्हावी, अविरत अन्नदान छत्र चालावे, सर्वासाम्य।न्य भक्तांना धरून, विचार घेऊन, मठाधिपती रमेशगिरीजी महाराज यांच्या सूचनेनुसार आश्रमाचा कारभार करावा,अशा भावना व्यक्त केल्या व त्याच्या पुढील काळाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
