
शिर्डीचा साई इलेवन संघ गावकरी चषकाचा मानकरी..!!
कोपरगाव प्रतिनिधी:- खेळाने मानसिक व शाररीक आरोग्य उत्तम
राहते.सांघिक भावना वाढीस लागते.खेळात हार जित होतच असते.हरणे हे अपयश
नसुन यशाची पहीली पायरी असते.युवा नेते विवेक कोल्हे हे नेहमीच युवकासाठी
क्रिडा क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असतात.खेळात नेहमी खिलाडु वृत्ती
जोपासली पाहीजे असे प्रतिपादन कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष
आप्पासाहेब दवंगे यांनी केले.
आठ दिवसापासुन रांजणगाव देशमुख येथे गावकरी चषक टेनिस बॅाल क्रिकेट
स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.बक्षीस वितरणाप्रसंगी ते बोलत
होते.यात ४० संघानी सहभाग नोंदविला. जिल्हा बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे
यांच्यावतीने प्रथम ३१ हजार १११ रुपयाचे,राज्यमंत्री बच्चु कडु यांचे
विशेष कार्य आधिकारी डॅा उमेश देशमुख व प्रशांत देशमुख यांचेकडुन द्वितीय
२१ हजार १११रुपयाचे,यदृच्छा पेट्रोलीयमचे रविंद्र खालकर यांचेकडुन तृतीय
११ हजार१११ तर बाबासाहेब रणधिर यांचेकडुन चतुर्थ ७ हजार ७७७ रुपयाचे
बक्षीसे देण्यात आली या व्यतिरीक्तही विविध बक्षीसे देण्यात आले.
शिर्डीचा साई इलेवन संघ प्रथम गावकरी चषकाचा मानकरी ठरला. सुभान इलेव्हन
संघ द्वितीय पारितोषकाचा मानकरी ठरला.पुणतांब्याचा संघ तृतीय
पारितोषकाचा मानकरी ठरला तर कुरणचा संघ चतुर्थ संघाचा मानकरी ठरला.
बक्षीसवितरण प्रसंगी कोल्हे कारखान्याचे संचालक अरुण येवले,अशोक
औताडे,विक्रम पाचोरे,चंद्रकांत औताडे,कैलास रहाणे,उपसरपंच बाबासाहेब
गोर्डे,सदस्य बाळासाहेब गोर्डे,प्रकाश गोर्डे,विलास वामन,सुरेश
देशमुख,सचिन गोर्डे,पराग खंडीझोड,त्र्यबंक वर्पे,शरद देशमुख,योगेश
चव्हाण,संजय गोर्डे,अनिल खालकर,नितीन थोरात,राहुल वर्पे,सचिन
खालकर,अलिशान सय्यद,सुखलाल गांगवे,सुभान सय्यद,अक्षय ठोंबरे सौरभ
वामन,योगेश गोर्डे,मंगेश खालकर आदिसह क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.
.
