
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव बाजारतळ येथे एका तरुणाचा बाजाराच्या दिवशी खुन झाला होता.या खुनातील आरोपींना अटक करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी नाम रविंद्र ययनराव भोसले वय ३१ वर्षे धंदा मजुरी रा. गोपाळवाडा, संजीवणी कारखाणा शिंगणापुर ता. कोपरगाव यांचा भाउ राजेंद्र बबनराव भोसले वय २८ वर्ष रा. गोपाळवाडा संजीवणी कारखाना शिंगणापुर याचे व आरोपो १) राहुल रविंद्र ऊर्फ संजय माळी रा. मोहोनीराज नगर कोपरगाव २) राहुल गणेश मगर रा.गोरोबानगर, कोपरगाव ३) गफुर अब्दुलगणी बागवान रा.लिंबारा मैदान, कोपरगाव ४) विराज कैलास कानडे रा. लिवारा मैदान, कोपरगाव दांत दिनांक 03.01.2022 रोजी 15.30 वा चे सुमारास मोटार सायकलला कट लागल्याचे कारणावरुन बाचाबाची वरून वाद होवून मारहान होवून त्या मारहाणीत यातील आरोपी क्र.०१ राहुल रविंद्र ऊर्फ संजय माळी वय २० वर्ष रा. मोहीनीराज नगर कोपरगाव याने यातील फिर्यादी यांचा भाउ राजेंद्र भोसले (मयत )याचे डोक्यात दगड मारला त्यामुळे तो खाली पडला त्यावेळी यातील आरोपी क्र. २) राहुल गणेश मगर वय २२ वर्ष रा. गोरोबानगर, कोपरगाव व विधसघर्षीत बालक विराज कैलास कानडे वय १७ वर्ष रा. लिंबारा मैदान, कोपरगाव यांनी त्यास लाथांनी मारहान केली त्याचवेळी आरोपी क्र. ३) गपुर अब्दुलगणो बागवान वय २६ वर्ष रा.लिबारा मैदान, कोपरगाव याने त्याचे हातातीत लोखंडी टॉमीने फिर्यादीचा भाउ राजेंद्र भोसले याचे डोक्यात तीन चार वेळेस मारून त्यास गंभीर जखमी करून जिवे ठार मारुन सदर आरोपी हे गुन्हा करून त्या ठिकाणवरून पसार झाले होते.मा.पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील सो, अहमदनगर, मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती दिपाली काळे मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संजय सातव सो. शिडी विभाग शिर्डी यांचे मार्गदर्शनाने वेगवेगळे पोलीस पथक तयार करून यातील आरोपींचा कसोशीने शोध घेवून आरोपी क्र. ०१ राहुल रविद्र ऊर्फ संजय माळी यास चार तासाचे आत अटक केली व राहिलेले आरोपी गफुर अब्दुलगणी बागवान राहुल गणेश मगर यांना चौविस तासाचे आत अटक केली आहे. सदर गुन्हयामध्ये आरोपी क्र.०९ राहुल रविंद्र ऊर्फ संजय माळी वय २० वर्षे रा. मोहीनीराज नगर कोपरगाव, २) राहुल गणेश मगर वय २२ वर्षे रा. गोरोबानगर, कोपरगाव ३) गफुर अब्दुलगणी चागवान वय २६ वर्ष रालिवारा मैदान, कोपरगाव व विधीसंघर्षीत बालक विराज कैलास कानडे वय १७ वर्ष रा.लिबारा मैदान, कोपरगाव) यांचा समावेश असून सदर आरोपीतांना मा. न्यायालसमक्ष हजर करून त्यांचा पोलीस कोठडी रिमांड घेवून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक, वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते हे करीत आहेत.

सदरची तपास कारवाई मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. वासुदेव देसले, पोसई भरत दाते, पोसई रोहिदास ठोंबरे, स.फी. संजय पवार, पो ना अर्जुन दारकुंडे, पो ना कोरेकर, पोना शेवाळे, पो कॉ संभाजी शिंदे, पो कों खारतोडे, पो कॉ गणेश काकडे, पो कॉ थोंगडे थोरात, पो कॉ दिपक ढाकरे, पो.कॉ गणेश मैड, पो कॉ मासाळ, मपोकों बनकर, म.पो.कॉ त्रिभुवन, मपोकों विजया दिवे, यांनी केलेली आहे
