लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने लसी करण मोहीम घरो घरी जाऊन राबविण्यात यावी:- वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष शरद खरात…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
राज्यात 1 मे पासून 18 ते 44 वयोगटा साठी कोरोना लसीकरणासाठी सुरवात झाली आहे लसी चा पुरवठा अतिशय मर्यादित असल्याने लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. लसीकरण केंद्र कोरोनाचे प्रसार माध्यम होऊ नये
वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांनी केलेल्या विविध जनसंपर्क मोहिमेदरम्यान, असे दिसून आले. गर्दीच्या लसीकरण केंद्रावर संसर्ग होण्याच्या भीतीमुळे बरेच लोक लस घेण्यास फार उत्सुक नसतात तसेच बऱ्याच वृद्ध लोकांना लसीकरण केंद्रावर पोहचण्यासाठी आणि लसीकरण केंद्र मध्ये मदत करण्यासाठी मदत करणारी माणसे नसतात. या शिवाय ऑनलाईन पोर्टल वर नोंद करणे प्रत्येक नागरिकाला शक्य होत नाही. त्यामुळे त्या नागरिकांची हेळसांड होते.
एकीकडे कोरोनाचा प्राधुरभवामुळे गर्दीच्या ठिकाणी जाण्याच धोकादायक असल्यामुळे प्रशासण लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाण्यास टाळ्याला सांगत आहोत आणि दुसरीकडे लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गर्दी वाढत चाललेली आहे. त्यामुळे कोरोनाचा अजून शिरकाव होऊ शकतो. हे टाळण्यासाठी आणि लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने लसी करण मोहीम घरो घरी जाऊन राबविण्यात यावी. अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष शरद खरात यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रका द्वारे प्रशासनाला नम्र विनंती
केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *