
कोपरगाव प्रतिनिधी:-
सर्वत्र ऑलिम्पिक सुवर्णपदकाची धूम चालू असताना देशाचे भावी खेळाडू करताहेत देवळाली प्रवराच्या स्मशानभूमीत सराव… पदक तालिकेत देशाचे नाव उंचावणेसाठी गाव तिथे क्रीडांगण संकल्पना राबविणे गरजेची असून स्मशानभूमीत खेळाडूंवर सराव करणेची वेळ यावी हे येथील अपरिपक्व नेतृत्वाचे अपयश असल्याची खंत शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी व्यक्त केली.

ऑलिम्पिक स्पर्धेचा आज समारोप होत आहे, 135 कोटी लोकसंख्येचा अनु राष्ट्र असलेला आपला देश पदकतालिकेत थेट 47 व्या स्थानी आहे, तरीही 1 सुवर्ण, 2 रजत आणि 4 कांस्य पदके घेऊन आम्ही हुरळून गेलोय, जल्लोष साजरा करतोय, ऑलिम्पिक इतिहासात 121 वर्षात आम्ही पदकांची शंभरी सुद्धा अजून गाठू शकलो नाही. त्याची कारणे गाव खेड्यात जाऊन तपासावी लागतील..,


ऑलिम्पिक खेळात आपल्या देशाचे स्थान या मुद्यावर आमचे प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना आप्पासाहेब ढुस बोलत होते.. ऑलिम्पिक मधील पदक विजेत्या सर्व भारतीय खेळाडूंचे अभिनंदन करून पुढे बोलताना ढुस म्हणाले की,
देवळाली प्रवरा सारख्या ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावूनही येथील भावी खेळाडू आज स्मशानभूमीत सराव करीत आहेत. हे येथील अपरिपक्व राज्यकर्त्यांचे अपयश आहे असेच म्हणावे लागेल.
राज्यात एकेकाळी क वर्ग नगरपालिका क्षेत्रात सर्वात श्रीमंत नगरपालिका म्हणून समजल्या जाणाऱ्या देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील खेळाडू साठी राज्यकर्त्यांना आज पर्यंत ना क्रीडा संकुल करता आले.., ना नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक., ना अस्तित्वात असलेली व्यायाम शाळा सुस्थितीत ठेवता आली, केवळ त्यामुळेच आज येथील तरुणांना स्मशानभूमीत व्यायाम करण्याची आणि खेळाचे मैदान बनवणेची वेळ आली आहे.
नगरपालिकेला कुरण समजणारी मंडळी केवळ स्व-वीकासात दंग राहिल्याने गावचा क्रीडा विकास खुंटला आहे. गावच्या जमिनी अवथुन बसलेल्या मंडळींनी त्या क्रीडांगणासाठी उपलब्ध करून दिल्यास गावात भव्य क्रीडा संकुल होऊ शकेल, मात्र यांचे उत्पन्न बुडेल म्हणून काही मंडळी या जमिनी सोडायला तयार नाहीत. काही मंडळीं या जमिनीचा वाढदिवस साजरा करायला वापर करीत आहेत परंतु क्रीडांगणाला द्यायला यांच्याकडे जमीन नाही हे येथील खेळाडूंचे दुर्दैव म्हणावे लागेल.
इतके करूनही ही स्व-विकास साधणारी मंडळी थांबत नाही.., गावातील काही खेळाडू स्वकष्टाने जर पुढे जायला लागले तर अश्या खेळाडूंना स्वयंघोषित किंवा समाजकंटक असे बिरुद लावून हिनवण्याचा केविलवाणा प्रयत्न काही बालिश आणि स्वयंघोषित देवदूत मंडळी करताना पाहून अशी मंडळी गावात असेपर्यंत ना आपले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचतील ना देश पदकतालिकेत अव्वल स्थानावर जाईल.
त्यासाठी गाव तिथे क्रीडांगण ही संकल्पना अमलात येनेच गरजेचे आहे असे शेवटी बोलताना आप्पासाहेब ढुस यांनी सांगितले.
