स्वच्छता कर्मचार्‍यांच्या वसाहतीसाठी प्रस्ताव तयार करा ना. आशुतोष काळेंच्या मुख्याधिकाऱ्यांना सूचना…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वसाहतीची झालेली दुरावस्था पाहून ना. आशुतोष काळे यांनी तातडीने स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या १०० फ्लॅटच्या वसाहतीसाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिल्या आहेत.श्री साईबाबा संस्थान च्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी नुकतीच कोपरगाव शहरातील नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वसाहतीची पाहणी केली. त्यावेळी वसाहतीच्या झालेल्या दुरवस्थेमुळे […]

Read More

संजीवनीमुळे जीवनाला नवसंजीवनी  मिळाली:- प्रा.साहेबराव दवंगे…

कोपरगाव प्रतिनिधी(रांजणगाव देशमुख):-माजी मंत्री स्व शंकरराव कोल्हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेत काम करतांना सातत्याने नवनवीन शिकायला मिळाले.चांगले काम करता आले.संजीवनी उद्योगसमूहांमुळे अनेकांना नवसंजीवनी मिळाली.त्याच प्रमाणे माझ्याही जीवनाला संजीवनी मुळे नवसंजीवनी मिळाली असल्याचे  प्रतिपादन प्रा.साहेबराव दवंगे यांनी केले.  कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष  प्रा साहेबराव दंवगे  यांनी  संजीवनी ग्रामीण शैक्षणिक संस्थेत ३८ वर्षे […]

Read More

शिर्डी येथील साईआश्रयात विधवा पुनर्विवाह:- साईसेवक गणेश दळवी…

कोपरगाव प्रतिनिधी:-साईबाबांच्या कृपाआशीर्वादाने सुरु असलेल्या सबका मलिक एक प्रतिष्ठान संचालित साईआश्रया परिवार सुरु आहे यात ज्या महिलांना माहेरचे व सासरचे असे कोणीही आधार देत नाही अशा निराधार व अन्याय अत्याचारीत महिलांसाठी माहेरघर हा प्रकल्प सुरु आहे अनेक महिलांचे घरातील वाद मिटवून पुनः हा त्यांना सासरी पाठवून त्याचे कुटुंब सावरले आहे तसेच ज्या विधवा महिला आहेत […]

Read More

नाशिक – मुंबई राष्ट्रीय महामार्गाची पावसाळ्यात होणारी दुर्दशा टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तयार रहावे:- मंत्री छगन भुजबळ…

महामार्गावर पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या:- मंत्री छगन भुजबळ… गोंदे ते वडपे आणि वडपे ते ठाणे परिसरातील रस्त्यांच्या कामासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयात पार पडली बैठक…कोपरगाव प्रतिनीधीमुंबई,नाशिक:- मुंबई राष्ट्रीय महामार्गाची पावसाळ्यात अत्यंत दुर्दशा होत असते. या मार्गावरील रस्ते निकृष्ठ असल्यामुळे जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यांच्या सर्व कार्यान्वयीन […]

Read More

शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा:- अॅक्सल अॅन्जेली…

संजीवनी इंटरनॅशनल डीपार्टमेंट अंतर्गत शेती विषयक परीसंवाद संपन्न…कोपरगांव प्रतिनिधी:-शेतीमालाचे अधिक उत्पादन, खर्चाची बचत, मनुष्य बळाचा कमी वापर, इत्यादी बाबी व षेती विषयक समस्या सोडविण्यासाठी रोबोटीक्स, आर्टिफिशिअल इंटिलीजन्स, मशिन लर्निंग, डीजिटल ट्वीन, अशा तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. सध्या युरोपियन देहसत या तंत्रज्ञानाचा वापराने शेतीमध्ये अमुलाग्र बदल झाले आहे, असे प्रतिपादन जर्मनी मधिल डीजीटल फ्युचर इन्व्ह्याॅनजिलिस्ट, […]

Read More

शासनाच्या निधीचा सदुपयोग करून घराचे स्वप्न साकार करा:- ना.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित असणाऱ्या नागरिकांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणावर निधी देत आहे. या निधीचा सदुपयोग करून नागरिकांनी घराचे स्वप्न साकार करा असे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले आहे.प्रधानमंत्री आवास योजनेच्या कोपरगाव शहरातील पात्र ४१ लाभार्थ्यांना १८ लाखाच्या […]

Read More

माझ्या विचारांचे उमेदवार निवडून द्या, विकासाचे प्रश्न शिल्लक ठेवणार नाही:- ना.आशुतोष काळे ; तो दिवस कोपरगावकरांसाठी व माझ्यासाठी आनंदाचा क्षण…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- तुम्ही निवडून दिलेले उमेदवार तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुन्हा तुमच्याकडे फिरकले नाहीत त्यामुळे तुमचे विकासाचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. त्यासाठी येणाऱ्या कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत मी दिलेले, माझ्या विचाराचे नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून द्या तुमच्या विकासाचे प्रश्न शिल्लक ठेवणार नाही अशी ग्वाही श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे यांनी […]

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या मातीला एक शाश्वत देणगी दिली ती म्हणजे स्वराज्य:- राजेंद्र झावरे…

कोपरगाव प्रतिनिधी:-शिवराज्याभिषेक दिना निम्मित कोपरगाव शिवसेनेच्या वतीने छ. शिवाजी महाराज्यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच, शिवस्वराज्यभिषेक दिन. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा. अशा या दिनाचं महत्व आणखी दृढ होण्यासाठी ६ […]

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रहारच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनीधी(राहुरी फॅक्टरी):-राहुरी फॅक्टरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करणेत आला.६ जून १६७४ शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा म्हणजे काय तर शेकडो वर्ष गुलामगिरीत खिचपत पडलेल्या आपल्या रयतेला स्वराज्य नावाच्या पहिल्या स्वातंत्र्याचा दिलेला ठाम विश्वास म्हणजे शिवराज्याभिषेक. आपला एक रक्षणकर्ता राजा आहे, आपलं एक तख्त आहे याची […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या ५९ व्या गळीत हंगामाची सांगता…

कोपरगाव प्रतिनीधी:- पेट्रोलला पर्याय म्हणून जगात ग्रीन हायड्रोजनवर मोठया प्रमाणात संशोधन सुरू होवुन त्याच्या अमलबजावणीसाठी त्यातील तज्ञ आता पुढे येवू लागले आहेत मात्र माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी स्वतःच्या अभ्यासातून सभासद शेतक-यांच्या सहकार्यातून नवनविन तंत्रज्ञानाचा आधार घेत काळाच्या कितीतरी अगोदर पुढे जात उसापासून केवळ साखर एके साखर उत्पादन न घेता साखरेबरोबरच हायड्रोजनेशनचा पाया घातला त्यातुन […]

Read More