
कोपरगाव प्रतिनिधी
(रांजणगाव देशमुख):-
माजी मंत्री स्व शंकरराव कोल्हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेत काम करतांना सातत्याने नवनवीन शिकायला मिळाले.चांगले काम करता आले.संजीवनी उद्योगसमूहांमुळे अनेकांना नवसंजीवनी मिळाली.त्याच प्रमाणे माझ्याही जीवनाला संजीवनी मुळे नवसंजीवनी मिळाली असल्याचे प्रतिपादन प्रा.साहेबराव दवंगे यांनी केले.
कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा साहेबराव दंवगे यांनी संजीवनी ग्रामीण शैक्षणिक संस्थेत ३८ वर्षे आणि ६ महिने अशी प्रदीर्घ सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झाले त्याबद्दल त्यांचा कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सपत्निक सत्कार आयोजित करण्यात आला होता.
या वेळी ते बोलत होते. प्रा. साहेबराव दवंगे व सौ संगीता दवंगे यांचा पत्रकार संघ व हितचिंकांनी सत्कार केला.यावेळी पत्रकार संघाचे सदस्य संजय भवर यांचा मुलगा अथर्व भवर स्काऊट परीक्षेत राज्यस्तरीय पुरस्काराने राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला त्याचाही पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी पुढे बोलतांना प्रा दवंगे म्हणाले कि,नितिनदादा कोल्हे, बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे,अमित कोल्हे, विवेक कोल्हे, सुमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाने सामाजिक शैक्षणिक कार्यात नेहमीच चांगले काम करता आले. संजीवनी ग्रामीण शैक्षणिक संस्थेत काम करताना शेतकरी शेतमजूर व सर्वसाधारण कुटुंबातील मुलांना मदत व मार्गदर्शन करु शकलो. या संस्थेमुळे देशभर मित्रपरिवार मिळाला.सेवानिवृत्त जरी झालो असलो तरी तेथेच सामाजिक काम करत रहाणार आहे.
यावेळी शंकर दुपारगुडे,रोहीत टेके,सोमनाथ सोनपसारे,हिरालाल महानुभव यांनी मनोगत व्यक्त केले

यावेळी हिरालाल महानुभव,सोमनाथ सोनपसारे,डॅा अरुण गव्हाणे,रोहीत टेके,युसुफ रंगरेज,संतोष जाधव,कार्याध्यक्ष लक्ष्मण जावळे,सचिव योगेश डोखे ,शंकर दुपारगुडे,मनोज जोशी,संतोष देशमुख,राहुल देवरे,हेमचंद्र भवर,संजय भवर,सहसचिव राजेंद्र गाडे,अक्षय खरात, नितीन जाधव,,सुनिल ससाणे,बिपीन गायकवाड,रविंद्र जगताप,अनिल दिक्षीत आदिसह पत्रकार व हितचिंतक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी पत्रकार संघाच्या सदस्यासह मंगेश मोरे व राम पंडोरे यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन लक्ष्मण जावळे यांनी केले तर आभार डॅा अरुण गव्हाणे यांनी मानले.


फोटोओळी:- प्रा साहेबराव दंवगे हे संजीवनी ग्रामीण शैक्षणिक संस्थेत ३८ वर्षे आणि ६ महिने अशी प्रदीर्घ सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झाले त्याबद्दल त्यांचा कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सपत्निक सत्कार करण्यात आला
