माझ्या विचारांचे उमेदवार निवडून द्या, विकासाचे प्रश्न शिल्लक ठेवणार नाही:- ना.आशुतोष काळे ; तो दिवस कोपरगावकरांसाठी व माझ्यासाठी आनंदाचा क्षण…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- तुम्ही निवडून दिलेले उमेदवार तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुन्हा तुमच्याकडे फिरकले नाहीत त्यामुळे तुमचे विकासाचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. त्यासाठी येणाऱ्या कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत मी दिलेले, माझ्या विचाराचे नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून द्या तुमच्या विकासाचे प्रश्न शिल्लक ठेवणार नाही अशी ग्वाही श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव शहरातील हनुमान नगर येथे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नामदार तुमच्या दारी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला याप्रसंगी नागरिकांशी संवाद साधताना नामदार काळे बोलत होते ते पुढे म्हणाले की, कोपरगाव शहरातील नागरिकांचा मुख्य प्रश्न हा पाणी प्रश्न आहे हा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी महा विकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कोपरगाव शहराच्या नवीन पाच नंबर साठवण तलाव व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी रुपये निधी महाविकास आघाडी सरकारने दिला आहे. विकासकामांसाठी निधी आणून विकास करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असते ते कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असतांना मतदारसंघासाठी आणलेल्या हजारो कोटी रुपयांच्या निधीतून मतदारसंघाची विकासाच्या बाबतीत वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही निवडून दिलेले उमेदवारांनी देखील विकास करणे तुम्हाला अपेक्षित होते मात्र तुमचा भ्रमनिरास झाला आहे याची मला जाणीव आहे. मात्र तुम्हाला झालेली चूक सुधारण्याची व आपल्या प्रभागाचा विकास करण्याची नामी संधी कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीतून प्राप्त होणार आहे तुम्ही मिळालेल्या संधीतून मी दिलेले, विकासाशी बांधील असलेले, माझ्या विचाराचे उमेदवार निवडून द्या तुमच्या प्रभागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास उपस्थित नागरिकांना नामदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिला.

याप्रसंगी मुख्याधिकारी शांतराम गोसावी, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता भगवंत खराटे, नायब तहसीलदार माधवी गोरे, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, पुरवठा अधिकारी दिपक भिंगारदिवे, पाणी पुरवठा अधिकारी ऋतुजा पाटील, शिक्षण प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पठारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, कार्याध्यक्ष संतोष चवंडके, माजी नगरसेवक मंदार पहाडे, प्रतिभा शिलेदार, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, रमेश गवळी, फकीर कुरेशी, दिनकर खरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा सचिव रेखा जगताप, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, राहुल देवळालीकर, जावेद शेख, चंद्रशेखर म्हस्के, रावसाहेब साठे, अशोक आव्हाटे, बाळासाहेब रुईकर, धनंजय कहार, राजेंद्र खैरनार, वाल्मिक लहिरे, संदीप कपिले, अंबादास वडांगळे, आकाश डागा, बाळासाहेब कडू, रामदास केकाण, इम्तियाज अत्तार, मनोज कडू, एकनाथ गंगूले, शैलेश साबळे, प्रसाद उदावंत, नारायण लांडगे, राजेंद्र आभाळे, मनोज नरोडे, संतोष दळवी, निलेश पाखरे, सुनील बोरा, मुकुंद इंगळे, चांदभाई पठाण, फिरोज पठाण, अक्षय आंग्रे, नितीन साबळे, आयुब कच्छी, युसूफ शेख, योगेश खालकर, किरण बागुल, नितीन साबळे, विकी जोशी, सागर लकारे, गणेश बोरुडे, हारुण शेख, सचिन गवारे, विशाल गुंजाळ, शफीक शेख, राजेंद्र फुलफगर, विजय पाटोळे, बंडु शिंदे, मयुर राऊत, माणिक जाधव, मच्छिन्द्र सोनवणे, राजेंद्र बारहाते, सलिम खाटीक, आमीनशेख, साई पवार, भाग्यश्री बोरुडे, शितल लोंढे, कविता मिरे, रंजना वाणी, पूनम पाटोळे, छाया फरताळे, शितल वायखिंडे, वर्षा नाईक, रहेमानताई सय्यद, सुवर्णा शिर्के आदींसह प्रभाग क्र. १० मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तो दिवस कोपरगावकरांसाठी व माझ्यासाठी आनंदाचा क्षण ….
चौकट :- ५ नंबर साठवण तलावाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे. लवकरच या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात येईल. गायत्री प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून आपण प्राथमिक स्वरूपातील काम पूर्ण केले असून पुढील कामाचे भूमिपूजन लवकरच समस्त कोपरगावकरांच्या उपस्थितीत करू ती आनंदाची बातमी देण्यास मी उत्सुक असून तो दिवस कोपरगावकरांसाठी व माझ्यासाठी आनंदाचा क्षण असेल.- ना. आशुतोष काळे

फोटो ओळ:- ‘नामदार तुमच्या दारी’ या उपक्रमा अंतर्गत कोपरगावात नागरिकांच्या समस्या जाणून घेतांना ना.आशुतोष काळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *