शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा:- अॅक्सल अॅन्जेली…

Uncategorized

संजीवनी इंटरनॅशनल डीपार्टमेंट अंतर्गत शेती विषयक परीसंवाद संपन्न…
कोपरगांव प्रतिनिधी:-
शेतीमालाचे अधिक उत्पादन, खर्चाची बचत, मनुष्य बळाचा कमी वापर, इत्यादी बाबी व षेती विषयक समस्या सोडविण्यासाठी रोबोटीक्स, आर्टिफिशिअल इंटिलीजन्स, मशिन लर्निंग, डीजिटल ट्वीन, अशा तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. सध्या युरोपियन देहसत या तंत्रज्ञानाचा वापराने शेतीमध्ये अमुलाग्र बदल झाले आहे, असे प्रतिपादन जर्मनी मधिल डीजीटल फ्युचर इन्व्ह्याॅनजिलिस्ट, अॅक्सल अॅन्जेली यांनी केले.
संजीवनी अभियांत्रिकी माहाविद्यालयाच्या संजीवनी इंटरनॅशनल रिलेशनस् डीपार्टमेंटने विध्यार्थी व प्राद्यापकांसाठी आयोजीत केलेल्या शेती विषयक परीसंवादात अॅक्सल अॅन्जेली बोलत होते. यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, काॅम्प्युटर विभागाचे प्रमुख डाॅ. डी. बी. क्षिरसागर, संजीवनी इंटरनॅशनल रिलेशनस् डीपार्टमेंटचे डीन डाॅ. महेंद्र गवळी, सर्व विभाग प्रमुख व डीन, प्राद्यापक, विध्यार्थी उपस्थित होते. अॅन्जेली यांचा जागतिक पातळीवर विविध देशांशी संपर्क असुन अनेक देशांनी त्यांच्या कार्याची नोंद घेतलेली आहे. संजीवनीत त्यांनी विध्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधुन कोपरगांव तसेच जवळपासच्या शेती विषयक समस्या कशा दुर करता येतील यावर मार्गदर्शन केले.
प्रारंभी डाॅ. क्षिरसागर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून अॅन्जेली यांना संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स अंतर्गत संस्थांची माहिती दिली. श्री अमित कोल्हे यावेळी म्हणाले की संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात जरी आधुनिक तंत्र ज्ञानाचे धडे दिले जातात, परंतु हेच तंत्रज्ञान शेती विषयक समस्या सोडविण्यासाठी अथवा परवाडणारी शेती करण्यास कसे उपयोगी पडू शकते, हे या परीसंवादा मार्फत अधिक स्पष्ट होणारे आहे.
यावेळी अॅन्जेली यांनी युरोप मधिल शिक्षण पध्दती विषयी सांगीतले की तेथे विविध कंपन्या या त्यांना लागणाऱ्या मनुष्यबळातील स्कील सेटस् बाबत तेथिल विद्यापीठांना अथवा काॅलेजेसला माहिती देतात, त्यानुसार शिक्षणाची अंमलबजावणी होवुन कुशल मनुष्यबळ निर्माण होवुन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. शेती उत्पादन वाढविण्यासाठी रोबोटचा वापर करावा असे त्यांनी सुचविले. याद्वारे पाण्याची व वेळेची बचत तसेच कामात अचुकता साधता येवु शकते. युरोपीयन देश आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत शेतीतुन अधिक उत्पादन घेत आहे. याची पुष्टी करताना ते म्हणाले की युरोपमध्ये भारतात एका एकरात जे उत्पादन होते त्याच्या पाच पट तर आफ्रिकेतील एका एकराच्या उत्पादनापेक्षा दहा पट उत्पादन युरोपमध्ये घेतल्या जातेे. शेती विषयक नवनवीन संशोधनाची गरज असल्याचे सांगुन ते म्हणाले की अशा संशोधनासाठी युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटीफिक अँड कल्चरल आर्गनायझेशन (युनेस्को) तसेच युरोपियन युनियन (इयु) यांच्याकडून आर्थिक मदत मिळु शकते.
प्राद्यापक व शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची अॅन्जेली यांनी उत्तरे दिली. विध्यार्थीनी मुग्धा लभडे हीने सुत्रसंचलन केले तर डाॅ. महेंद्र गवळी यांनी आभार मानले.

फोटो ओळी:- संजीवनी इंटरनॅशनल डीपार्टमेंट आयोजीत शेती विषयक परीसंवादात संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन करताना जर्मनी मधिल डीजीटल फ्युचर इन्व्ह्याॅनजिलिस्ट, अॅक्सल अॅन्जेली. योवळी श्री अमित कोल्हे, डाॅ. क्षिरसागर, डाॅ. गवळी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *