छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या मातीला एक शाश्वत देणगी दिली ती म्हणजे स्वराज्य:- राजेंद्र झावरे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
शिवराज्याभिषेक दिना निम्मित कोपरगाव शिवसेनेच्या वतीने छ. शिवाजी महाराज्यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच, शिवस्वराज्यभिषेक दिन. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा. अशा या दिनाचं महत्व आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागानं १ जानेवारी २०२१ रोजी परिपत्रकाद्वारे हा निर्णय घेतला. या अनुषंगानं यापुढे दरवर्षी ६ जून रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी दिली व ते पुढे म्हणाले छ.शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या मातीला एक शाश्वत देणगी दिली ती म्हणजे स्वराज्य. या प्रसंगी ग्रा.सं.कक्षाचे मा. जिल्हाप्रमुख मुकुंद सिनगर,शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल,सामाजिक कार्यकर्ते दिलीप सोनवणे व प्रवक्ते राहुल देशपांडे यांनी शिवराज्याभिषेक दिना निम्मित सर्व शिवप्रेमींना शुभेच्छा दिल्या. तसेच मुकुंद सिनगर यांची भोजडे वि.वि.कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्या बद्दल व कोपरगावचे आकाशवाणी म्हणून ओळख असलेले विजय कासलीवाल यांची सोनी टिव्ही च्या कोण होणार करोडपती या कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला. तसेच छ. संभाजी महाराजांच्या पुतळ्यास ही पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या वेळी जेष्ठ शिवसैनिक दिलीप अरगडे,अरुण बोराडे,वाहतूकसेना जिल्हाप्रमुख इरफान शेख,युवानेते विक्रांत झावरे,संजय बाविस्कर,सचिव बाळासाहेब साळुंके,उपशहरप्रमुख प्रफुल्ल शिंगाडे,विकास शर्मा,शेखर कोलते,सुनील कुंढारे,योगेश उशीर,संतोष झावरे,युवतीसेना जिल्हाधिकारी अक्षिता आमले, महिला आघाडी उपशहरप्रमुख अश्विनी होणे,संघटक वैभव गिते,सहसंघटक दिपक बरदे,अक्षय वाकचौरे,वाहतूक सेनेचे उपजिल्हाप्रमुख अमजद शेख,जाफर सय्यद,राकेश वाघ,विभागप्रमुख सतिश खर्डे,निलेश पवार,सुनील राका,सतीश शिंगाणे,निखिल मढवई,मधू पवार,भूषण वडांगळे,सुशील बोर्डे,श्रीपाद भसाळे,गोविंद चव्हाण,प्रवीण शेलार,अशोक पवार,अमोल तवरेज,सतीश लोळगे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विशाल झावरे,मयूर शिवदे, किसन भालेराव,हिरालाल तवरेज,शिवलिंग कहाते आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *