छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रहारच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा:- आप्पासाहेब ढुस…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी
(राहुरी फॅक्टरी):-
राहुरी फॅक्टरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करणेत आला.
६ जून १६७४ शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा म्हणजे काय तर शेकडो वर्ष गुलामगिरीत खिचपत पडलेल्या आपल्या रयतेला स्वराज्य नावाच्या पहिल्या स्वातंत्र्याचा दिलेला ठाम विश्वास म्हणजे शिवराज्याभिषेक. आपला एक रक्षणकर्ता राजा आहे, आपलं एक तख्त आहे याची रयतेला चिरंजीव हमी देणारा क्षण म्हणजे राज्याभिषेक. जगाच्या इतिहासातील एकमेव अशा सगळ्यात मोठ्या, अजरामर, भरभरून आनंद देणाऱ्या सोहळ्याच्या रयतेला राहुरी फॅक्टरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करून सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.


प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, प्रहार चे राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष शरद वाळुंज, उपाध्यक्ष एकनाथ वाणी, देवळाली उपाध्यक्ष ओंकार मुसमाडे, शाखाध्यक्ष अमोल आंबिलवादे, सल्लागार प्रभाकर कांबळे, राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *