
कोपरगाव प्रतिनिधी:-
साईबाबांच्या कृपाआशीर्वादाने सुरु असलेल्या सबका मलिक एक प्रतिष्ठान संचालित साईआश्रया परिवार सुरु आहे यात ज्या महिलांना माहेरचे व सासरचे असे कोणीही आधार देत नाही अशा निराधार व अन्याय अत्याचारीत महिलांसाठी माहेरघर हा प्रकल्प सुरु आहे अनेक महिलांचे घरातील वाद मिटवून पुनः हा त्यांना सासरी पाठवून त्याचे कुटुंब सावरले आहे तसेच ज्या विधवा महिला आहेत त्यांचा विधवा पुनर्विवाह करण्याचे ठरविले आहे ज्या महिलांचे वय 25 ते 30 वय आहे त्यांचे पुढील आयुष्य कसे जाईल या चिंतेने त्यांना समुपदेशन करण्यात आले होते त्यांना पुनर्विवाह बाबत माहिती देण्यात आली की महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिला विधवा पुनर्विवाह महाराष्ट्रातील पुणे येथे गोखले बागेत १८६९ साली पहिला विधवा विवाह पार पाडला या नंतर अनेकांचे असे विवाह पार पडले तेव्हा एक विधवा निराधार महिला वय 30 वैशाली व तिची मुले यांना शिर्डी पोलिसाकडून गेल्या 3 वर्षा पूर्वी साईआश्रयात दाखल केले होते हिने पुनर्विवाहचा निर्णय घेतला होता त्या प्रमाणे योग्य स्थळ शोधण्यात आले तेव्हा तिच्यासाठी संगमनेर तालुक्यातील मेंढवणं गावातील शेतकरी कुटुंबाचे स्थळ आले आहे मुलाचे नाव गणेश दिनकर बढे आहे वय 33 आहे तसेच स्वतःचे घर 15 एक्कर शेती 1 ट्रॅक्टर आहे व त्यांचे नातेवाईक कोते , वाबळे , गाढे , लबडे असे आहेत तेव्हा या विधवा निराधार महिला व बढे कुटुंबाने व मुलाने पसंती दाखविली मी तर मुलाचे व बढे कुटूंबाचे अभिनंदन करतो की आपण या महिलेला हक्काचा घर परिवार देत आहात तसेच साईआश्रयातील वैशालीचे देखील अभिनंदन की योग्य निर्णय घेण्याचे धाडस केले त्यामुळे महिलेला चांगला सु संस्कृत व संपन्न परिवार मिळाला आहे तिचे अंधःकारमय जीवन उध्वस्त आयुष्य साईबाबांच्या कृपेनें पुन्हा गुण्या गोविंदाणे प्रकाशमय वाटेकडे जात आहे तेव्हा या अतिशय पवित्र शुभ कार्याला आपण सर्वांनी उपस्थिती प्रार्थनीय ठेऊन शुभ आशिर्वाद दयावेत
ओम साई राम
साई सेवक – गणेश दळवी
मो – 9637549300
