जल है तो कल है, आ. विवेक कोल्हेंच्या पाठपुराव्याला यश, हिंगणी बंधाऱ्यावर नवीन लोखंडी प्लेट बसवण्याच्या कामाचा शुभारंभ…


कोपरगाव प्रतिनिधी: कोपरगाव व निफाड तालुक्यातील गोदावरी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. शासनस्तरावर मंजुरी मिळाल्यानंतर हिंगणी बंधाऱ्यावर नवीन लोखंडी प्लेट बसवण्याच्या कामाला रविवारी स्थानिक पदाधिकारी,नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.आ.विवेक कोल्हे यांनी केलेल्या या पाठपुराव्यामुळे दुष्काळात या निर्णयाचा मोठा फायदा होऊन विविध बंधाऱ्याचे अपव्यय होणारे पाणी जपले जाणार आहे.
कोपरगाव व निफाड तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ७ कोटी २९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, त्यातून विविध बंधाऱ्यांवर नवीन लोखंडी प्लेट बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
कोपरगाव मतदारसंघातील मौजे हिंगणी, माहेगाव देशमुख, डाऊच, सडे, शिंगवे, पुणतांबा तसेच निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथील गोदावरी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या फळ्या कालांतराने जीर्ण व निकामी झाल्या होत्या. त्यामुळे चालू हंगामात पुरेशा प्रमाणात पाणीसाठा करणे अडचणीचे झाले होते. या बंधाऱ्यांवर अवलंबून असलेल्या हजारो एकर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला होता.
ही परिस्थिती लक्षात घेऊन आमदार विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जलसंपदा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून नवीन लोखंडी प्लेट उपलब्ध करून देण्याची मागणी केली. शासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत निधी व कामांना मंजुरी दिल्याने आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.वरील सर्व बंधाऱ्यांच्या देखील फळ्या बसविण्यास लवकरच सुरुवात होणार आहे.जल है तो कल है या दृष्टिकोनातून बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि पाणीसाठवण क्षमता वाढविण्याचे हे काम शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा टिकून राहिल्यास परिसरातील शेती, पिण्याचे पाणी तसेच भूजल पातळीला त्याचा लाभ होण्यास मदत होणार आहे.
यावेळी बापूसाहेब धर्मा पवार, दत्तात्रय प्रभाकर पवार, दादासाहेब नानासाहेब पवार, त्रिभुवन पवार, काकासाहेब पवार,पांडुरंग कुदळे, ज्ञानेश्वर पवार, लक्ष्मण पवार, नयन पवार, आप्पासाहेब पवार, रावसाहेब पवार, पांडुरंग पवार, जालिंदर पवार, मुकेश पवार, अच्युत पवार, चिलाजी पवार, संतोष चंदनशिव, सुनील कुदळे, मोहन चंदनशिव, शुभम चंदनशिव, रामहरी चव्हाण, राजेंद्र पवार, राहुल गंगावणे, तेजस पवार, अशोक मोरे, राजेंद्र गंगावणे, संदीप कुदळे, साहेबराव पवार, मोहन पवार, सुभाष बर्डे, दशरथ पवार, अमोल चिलाजी पवार, अतुल पवार, रोहित बर्डे, कृष्णा पवार, अजित जाधव, सागर जाधव, दीपक पवार आदी उपस्थित होते.
ऊ
