
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज मन एका विवेंचनेत अडकले आहे आणि कोणाला माझं बोलणं ऐकुन हसु हि येईल,सर्व कमवले पण पैसा कमवायचा राहुन गेला आज मानवाचा पैस्या अभावी मृत्यु होतांना पाहून मन विचलित होते मृत्यु श्वाश्वत आहे
मृत्युची भिती नाही पण कोरोनाने मरण्याची सर्वांनाच भिती वाटते वारस असुन बेवारस आणि पैसा असुन दरिद्री अशी स्थिती आज माणसाची झाली आहे
त्यांच्याकडे पैसा आहे त्यांना तो सोडु वाटत नाही आणि ज्यांच्याकडे नाही त्यांना जवळ ठेऊ वाटत नाही मृत्यु हा अटळ आहे पण काही जण घर दार विकुन जिव वाचवण्याचा अट्टाहास करत आहे आणि काही जण त्याच पैस्यावर जगण्याचे स्वप्न पाहत आहे
हे भयावह चित्र पाहताना मन रक्ताश्रु गाळत पण करणार काय दुसऱ्याचा काय पण स्वताच्या जिव आपण वाचवु शकत नाही हि हतबलता जगुन मरण्याजोगी आहे
याच शल्य हे सदैव राहिलं
इथं शोध सुखाचा संपतच नाही म्हणुन मरतांना संग माणुस काही नेत नाही तरी तरी त्या पैस्या करता जिवनाश्यक औषधी विलाज महागला आहे
म्हणुन माणुस मरण समोर पासुन हि पैस्याने सुख मिळत यांची मृगजळी आशा कधीच सोडत नाही ….
जयहिंद
