कोपरगाव तालुका वंचित बहुजन आघाडीची खालीलप्रमाणे कार्यकरिणी जाहीर करण्यात आली:- वंचितचे नेते शरद खरात…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
वंचित बहुजन आघाडीच्या कोपरगाव तालुका अध्यक्ष पदी चांदेकसारा येथील रणजित खरात व धमोरी येथील रवींद्र अहिरे महासचिव पदी तसेच कोपरगाव शहर अध्यक्ष पदी राहुल शिरसाठ व कोपरगाव शहर महासचिव पदी अब्बास सय्यद यांची निवड करण्यात आली या वेळी जिल्हाध्यक्ष विशाल (भैया) कोळगे यांनी व्हाट्सअप्प द्वारे वंचितचे नेते शरद खरात यांच्या कडे अध्यक्ष व महासचिव पदाचे नियुक्ती पत्र पाठवले. आज दिनांक ३०/६/२१ कोपरगाव येथील वंचितच्या संपर्क कार्याल्यात वरील सर्वाना वंचितचे नेते शरद खरात व युवा तालुका अध्यक्ष पै.साईनाथ जाधव यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले व पुढील कार्यस शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी संजय कोपरे,संजय पंढरे, पवन लाड, आकाश आंबोरे, निलेश उदावंत, चेतन खरात, साईश तनपुरे इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *