
कोपरगाव प्रतिनिधी:-
येथील सहकारमहर्षि कोल्हे कारखान्यांचे सेवानिवृत्त कार्यकारी बाळासाहेब सुर्यभान उर्फ बी. एस. शिंदे (७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाउ, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबददल माजीमंत्री शंकरराव कोल्हे, अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, संचालक साहेबराव कदम, अरूण येवले, संजय होन आदिनी शोक व्यक्त केला.
स्व. बी. एस. शिंदे यांनी सहकारमहर्षि कोल्हे कारखान्यात सेल्स असिस्टंट म्हणून नोकरीची सुरुवात करत असिस्टंट मार्केटींग मॅनेजर, सेकेटरी, जनरल मॅनेजर केमिकल आणि कार्यकारी संचालक म्हणून उत्कृष्ट व्यवस्थापन हाताळले. साखर, आसवनी व रासायनिक विभाग कार्यप्रणालीत त्यांचा हातखडा होता. इंग्रजीवर त्यांचे प्रभुत्व होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालय, सिम्बायोसिस इन्स्टीटयूट, विधी महाविद्यालय, पुणे येथुन शिक्षण पूर्ण केले होते. कोपरगाव पंचायत समितीचे सभापती स्व. सुर्यभान विठठल शिंदे यांचे ते चिरंजीव होते. त्यांच्या निधनानाबददल अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
