संजीवनी हेल्पलाईनच्या माध्यमांतून आजारपणात मदतीचे पाठबळ उभं करणार:-स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोनामुळे अनेकांच्या जीवनांत स्थित्यंतरे आली, आजार म्हटलं की जीव नकोसा होतो, दुर्धर आजारात प्रत्येकाचे पाठबळ वाढावे, मदतीचे मार्गदर्शन मिळावे म्हणून संजीवनी हेल्पलाईन मतदारसंघवासियांच्या पाठीशी चोवीस तास राहिल असा विश्वास भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केला. संजीवनी उद्योग समुहान सतत नाविन्यपुर्ण उपक्रम सुरू करून संकटात मदतीचा हात सर्वप्रथम पुढे केला आहे.
सौ. स्नेहलता कोल्हे यांचा वाढदिवस शुक्रवारी विविध सामाजिक उपक्रमांनी साध्या पध्दतींने कोरोना नियम पाळून साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी येथील कलश मंगल कार्यालयात युवानेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतुन संजीवनी हेल्पलाईन सुरू करण्यांत आली त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचे खंबीर मार्गदर्शन, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांची साथ आणि मतदार संघातील प्रत्येकाचे आर्शिवाद यामुळे कोरोनाला हरवून समाजकार्यात आपण पून्हा सकीय झालो माझे सुख-दुःखात सर्व आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यामुळे आपणही त्यांना अंतर देणार नाही असेही त्या म्हणाल्या.
याप्रसंगी डॉ शेखर फडके, डॉ योगेश कोठारी, डॉ गणेश ठोंबरे, डॉ निलेश काबरा, डॉ मनोज बत्रा यांच्या मार्गदर्शनांखाली सर्वरोगनिदान शिबीर घेण्यांत आले. विविध क्षेत्रात नांवलौकीक मिळविलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून गौरी गणपती सजावठ स्पर्धेतील विजेत्यांना सौ. कोल्हे यांच्या हस्ते पारितोषके देण्यांत आले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, बबनराव लोणीकर, चंद्रशेखर बावनकुळे, महंत रामगिरी महाराज, ब्रम्हकुमारी सरलादिदी यांच्यासह असंख्य हितचिंतकांनी सौ. कोल्हे यांना वाढदिवसानिमीत्त भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.
कलश मंगल कार्यालयात उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी, भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, उपाध्यक्ष शरद थोरात, विधीज्ञ रविंद्र बोरावके, कैलास खैरे, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, राजेंद्र सोनवणे, विजय वाजे, सेनेचे गटनेते योगेश बागुल, कैलास जाधव, भाजपाचे गटनेते रविंद्र पाठक, शहराध्यक्ष दत्ता काले, अतुल काले, मनसेचे निलेश काकडे, कोल्हे कारखान्यांचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, संचालक संजय होन, ज्ञानेश्वर परजणे, राजेंद्र भाकरे, प्रदिप नवले, साहेबराव कदम, अरूण येवले, अशोक भाकरे, बाळासाहेब नरोडे, कामगार नेते मनोहर शिंदे, कामगार संचालक वेणुनाथ बोळीज, डॉ दत्तात्रय मुळे, विनोद राक्षे, निलांबरी राउत, ओबीसी सेलचे बाळासाहेब गाडेकर, नारायण अग्रवाल, मंगल आढाव, वैशाली आढाव, शिल्पा रोहमारे, विद्यासोनवणे, स्वप्नील निखाडे, बबलु वाणी, दिपक जपे, सचिन कोल्हे, रंजन जाधव, पप्पु पडीयार, संदिप देवकर, जनार्दन कदम, नंदकुमार विसपुते, बापू पवार, शंकर बि-हाडे, फकिर महंमद पहिलवान, खालीकभाई कुरेशी, मावळा ग्रुप, विष्णुपंत क्षिरसागर, दगुराव चौधरी, मधुकर उगले, मनोज चव्हाण, सुभाष शिंदे, रवि रोहमारे, महेश खडामकर, पुंजाजी राउत, उपसरपंच चंद्रकांत चांदर, प्रशांत कडु, राहुल सुर्यवंशी, गोपि गायकवाड, योगेश जोबनपुत्रा, सुनिल वाणी, रमेश क्षीरसागर, दिपक चौधरी, सिध्दार्थ साठे, वासु शिंदे, गोरख टुपके, डॉ मोरे आदिंनी सौ. कोल्हे यांचा वाढदिवसानिमीत्त सत्कार केला.
सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, महिलामंडळ ते विधीमंडळ अशी आपल्या सामाजिक कार्याची सुरूवात असुन सत्ता असो अगर नसो पण सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत राहुन त्यांच्या चेह-यावरील हास्य हीच आपली उर्जा आहे. तळागाळातील भावांनी आपल्या साठी जे जे केलं ते आपण कधीही विसरू शकत नाही. कोपरगांव विधानसभा मतदार संघाच्या विकासाचा ध्यास मनांशी जपला आणि त्याला केंद्र व राज्य शासनांच्या विविध योजनांची किनार जोडत गेले. गत पाच वर्षाच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोटयावधी रूपयांचा विकासनिधी देत पाठबळ दिलं., माणसांत देव पाहिला, नवरात्रीच्या नवदुर्गा शक्तीचा जाग आहे त्याच आत्मशक्ती जागृत करून विकासकार्याला साथ देतात, कोरोनामुळे आपण आजारी असल्याने गेल्यावर्षी वाढदिवस साजरा करता आला नाही पण त्यातुन सहीसलामत बाहेर पडल्यावर जनविकासाचा ध्यास घेत रंजल्या-गांजलेल्यांच्या जनकल्याणासाठी लावायचा हीच खुणगाठ मनांशी बांधली त्यातुन कर्तृत्ववान महिलांचा सन्मान येथे होत आहे. मरणाला आणि टिकाकर्त्यांच्या बोलण्याला आपण घाबरत नाही, स्त्री हे शक्तीचं रूप आहे आणि त्यातून कोपरगांव विकासाचा ध्यास आपल्याला घडवायचा आहे असे त्या म्हणाल्या. शेवटी शहराध्यक्ष दत्ता काले यांनी आभार मानले.

फोटोओळी:-कोपरगांव
भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत युवानेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतुन येथील कलश मंगल कार्यालयात आरोग्यासंदर्भात संजीवनी हेल्पलाईन सुरू करण्यांत आली त्याचा लोकार्पण सोहळा सौ. कोल्हे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यांत आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *