रंग रेषांचा बोलविता, पेंटर (चित्रकार);कै सुरेंद्र वरोडे:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:- माणूस प्रारंभी भाव हातवारे करत आपल्या मनातील भावना व्यक्त करीत नंतर मुखाने बोलायला सुरुवात केली आणि आवाज निर्माण झाले त्या नंतर शब्द व चिन्ह/ चित्र निर्माण केले गेले शब्द व चिन्ह चित्र हे संवाद माध्यम झाले कालौघात चित्र हि एक कला कलात्मक तेने जपली गेली कोणत्याही कला माणसाला जगण्यासाठी आवश्यक आहे कला माणसाला दुःख विसरायला लावतात शिणभाग निघून जातो या शिवाय कला पोट भरण्यासाठी उपयुक्त ठरते आहे
कोपरगाव शहरात तालुक्यात नावाजलेले कलाकार अनेक असून त्या पैकी एक नाव म्हणजे कै सुरेंद्र पेंटर हे होय
जुन्या पोलिस स्टेशन जवळ (गोखरूबा गल्ली तील) पेंटर सुरेंद्र यांनी तीनही थिएटर सुरू असताना आकर्षक पणे बोर्ड रंगवून चित्रपट रसिकांना मंत्रमुग्ध केले होते त्याकाळी कापड कांजी चरस लावून बोर्ड रंगवले जात शुभविवाह समारंभ प्रसंगी लहान मोठ्या प्रमाणात सुरेंद्र पेंटर बोर्ड रंगवून कार्यक्रमाची शोभा वाढवित रंग आणि रेषा अगदी सहजतेने बोलक्या करण्याची कला यांचा हातखंडा होता रंगरेषांचा महान कलाकार असूनसुद्धा या माणसाला मी पणा मग्रूर पणा नव्हता ताठा अजीबात नव्हता कोणीही गिरहाईक कधिहि आले तर ते लीनतेने नम्रतेने आदराने बोलत कोणत्याही कामासाठी कधी अडवणूक केली नाही रंग आणि रेषांचा छंद जोपासताना व्यवसाय केला परंतु कालौघात अनेक बदल झाले यंत्रयुग आले व्यवसायाचे तंत्रज्ञान प्रगत झाले हस्त कला मागे पडून डिजीटल फ्लेक्स चे युग अवतरले कै सुरेंद्र पेंटर यांनी बदल स्वीकारले आणि धंदा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले काळाच्या ओघात तंत्रज्ञान प्रगत झाले आणि करणारे खुप झाले स्पर्धा वाढली चढाओढ सुरू झाली यात दर( भाव) चढाओढ सुरू झाली घसरण होत असताना स्पर्धा वाढली
रंग रेषांचा छंद जोपासताना व्यवसाय करणारे कलाकार असूनसुद्धा संगणक ऍनीमेशन डिजिटल तंत्रज्ञान अवगत करून लढत दिली कुंचल्यातून ( ब्रशच्या मदतीचा वापर करून) कला साकारताना आनंद देणारे चित्रकार संगणक निष्णात झाले
असो काळाचा महिमा अगाध आहे माणूस विधात्याने बनवलेले बाहुले आहे काळाच्या पुढे कुणाला जाता येत नाही जे काळाच्या उदरात दडले आहे तेच होणार ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहेच शेवटी सारे प्रवासी घडीचे
माणूस जातो पण आठवण राहते
कै सुरेंद्र वरोडे पेंटर आज आपल्यात नाहीत पण अनेक आठवणी मनात रुंजी घालतात
परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो
घरातील माणसांना दुःख सहन करण्यासाठी बळ देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
ओम शांती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *