कोपरगाव नगरपरिषदेच्या कार्यालयीन इमारतीच्या वरील मजल्यांचे भूमीपूजन दि.२० सप्टेंबर रोजी करण्यात आले:- विजय वहाडणे…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगाव नगरपरिषदेच्या कार्यालयीन इमारतीच्या वरील मजल्यांचे भूमीपूजन दि.२० सप्टेंबर रोजी करण्यात आले.अनेक वर्षे कोपरगाव शहर-तालुका व परिसरातील अपघात-आत्महत्या, बेवारस मृतदेहांची प्रामाणिकपणे वाहतूक करणारे रुग्णवाहिका चालक श्री. अमित खोकले व नगरपरिषदेचे स्वच्छता दूत, मेहनती सफाई कामगार श्री. राजू मेवाते यांचे हस्ते पार पडले. उद्यापासून पितृपक्ष सुरू होत असल्याने व कामाला उशीर होऊ नये म्हणून आजच भूमिपूजन करण्यात आले. गेली 5 वर्षे मी जास्तीतजास्त वेळा सर्वसामान्य व्यक्तींनाच अशा पद्धतीने सन्मान देण्याचा प्रयत्न करत आहे.
या कामासाठी आ.आशुतोषजी काळे यांच्या विशेष प्रयत्नांतून वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान ठोक योजनेतून 4 कोटी रू. निधी मिळालेला आहे. तळमजला व पहिल्या मजल्याचे काम माजी आ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रयत्नांतून मिळालेल्या 2 कोटी रुपये निधीतून पूर्ण झालेले आहे.त्या इमारतीचे उदघाटन सर्व नेत्यांना बोलावून लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *