कोरोना महामारीच्या काळात श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचे कार्य उल्लेखनीय:- जिल्हाधिकारी डॉ. श्री.राजेंद्र भोसले…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनीधी:-
कोपरगांव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाला नुकतीच जिल्हाधिकारी श्री.राजेंद्र भोसले यांनी भेट दिली.त्या प्रसंगी शिक्षकांना मार्गदर्शन करतांना कोरोना महामारीत कोपरगांव शहराने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले व त्यात श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाने कोरोना नियंत्रणात मोलाची कामगिरी बजावाली असल्याचे सांगितले.नुकताच नासिक येथील आदर्श जिल्हाधिकारी पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे व सहसचिव सचिन अजमेरे यांनी जिल्हाधिकारी डाॕ. श्री.राजेंद्र भोसले यांचा सत्कार केला..या प्रसंगी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, कोपरगांव नगरपालीकेचे मुख्याध्याधिकारी श्री.शांतराम गोसावी,विदयालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,डाॕ.अमोल अजमेरे,राजेश ठोळे,राष्ट्रवादी काॕग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्प,कोपरगांव नगरपालीकेचे स्वच्छता अधिकारी महारुद्र गलाट,स्वच्छता दुत सुशांत घोडके,दिगंबर जैन समाजाचे पंच गोकुळ गंगवाल,राजाभाऊ गंगवाल,गोदामाई प्रतिष्ठाणचे आदिनाथ ढाकणे आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर मान्यवरांचे स्वागत केले. जैनमुनी १०८श्री.वर्धमानसागर महाराज आणि संघ यांचे जिल्हाधिकारी डाॕ.राजेंद्र भोसले यांनी आर्शिवाद घेतले.विदयालयाचे आदरस्थान कै.गोकुळचंदजी ठोळे यांच्या पुतळ्यास त्यांचे हस्ते पुष्पहार घालण्यात आला.

कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले असताना कैलास शेठ ठोळे आणि परीवाराने शासन प्रशासनाला भरीव मदत केली मोलाचे योगदान दिले त्या साठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सन्मान केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक आर.बी.गायकवाड यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुरेश गोरे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता डी.व्ही.तुपसैंदर, यु.एस. रायते,ए.बी.अमृतकर,ए.जे.कोताडे,वाय.के.गवळे,एन.के.बडजाते,डी.व्ही.विरकर आदिनी विशेष परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *