ज्येष्ठ लेखक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांना मंत्री छगन भुजबळ यांची श्रद्धांजली…

कोपरगाव

महाराष्ट्राचा बहुआयामी तारा निखळला:- छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-
चतुरस्त्र लेखक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाच्या वृत्ताने l धक्का बसला असून महाराष्ट्राचा बहुआयामी तारा निखळला अश्या शब्दात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

आपल्या शोकसंदेशात मंत्री भुजबळ म्हणाले की, डॉ. अनिल अवचट यांनी दलित, मागासवर्गीय, मजूर, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपूल लेखन केले आहे. त्यांनी सुरू केलल्या मुक्तांगण या संस्थेच्या माध्यमातून हजारो लोक हे व्यसनापासून मुक्त झाले. त्यामुळे फक्त केवळ साहित्य विश्वताच नाही तर समाजातही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

डॉ. अनिल अवचट यांना श्रद्धांजली वाहताना श्री भुजबळ म्हणाले की डॉ. अवचट यांच्या निधनाने एका हरहुन्नरी लेखक, आणि सामाजिक कार्यकर्ता महाराष्ट्राने गमावला आहे. त्यांच्या निधनाने अवचट कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय अवचट कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *