लायन्स व लिओ क्लब, ठोळे स्कुल, कोपरगाव यांच्या वतीने लीगल सर्व्हिस अथोरिटीच्या निर्देशनानुसार जनतेला कायदेविषयक जनजागृती चे आयोजन…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- दिनांक 17 सप्टेंबर रोजी नॅशनल लीगल सर्व्हिस अथोरिटी च्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात सर्वसामान्य जनतेला कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून कोपरगाव न्यायालयाच्या वतीने तालुका लीगल सर्व्हिस समिती, भागचंद माणिकचंद ठोळे स्कूल व लायन्स क्लब व लिओ क्लब ऑफ कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बी. एम. टी. इंग्लिश मेडिअम स्कूल मधील सर्व शिक्षकांना भारतीय संविधानातील कायदेविषयक जनजागृती करण्यात आली.लायन्स क्लब ऑफ कोपरगाव चे अध्यक्ष राम थोरे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर सरकारी वकील मा.अशोक टूपके यांनी कायद्यातील अगदी छोट्या गोष्टी कशा असतात आणि त्यांचे नकळत उल्लंघन कसे होते हे सांगितले तर तसे होऊ नये असे आवाहन केले. कोपरगाव न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीश मा. एस. एन.सचदेव मॅडम यांनी समाजातील छोटे छोटे मतभेद आणि वाद लोकन्याल येथे घेऊन ते स्वयंस्फुर्तीने व एकमेकांचे सहकार्याने मिटवा आणि समाजात शांतता प्रस्थापित करावी असे आवाहन केले. तसेच वरिष्ठ न्यायाधीश मा. डोईफोडे साहेब यांनी आजचे विद्यार्थी उद्याचे भावी नागरिक आहेत म्हणून त्यांच्यामार्फत एक आदर्श समाज आम्हाला घडवायचा आहे त्यासाठी सर्व शिक्षकांची भूमिका महत्वाची असणार आहे असे सांगितले.यावेळी तालुका विधी सेवा प्राधिकरण चे मनोज कडू व स्थानिक स्कूल कमिटीचे प्रसिद्ध उद्योजक राजेश ठोळे, मुख्याध्यापक मा.निमूनकर सर उपस्थित होते.


तसेच लायन्स क्लब ऑफ कोपरगाव चे सचिव अक्षय गिरमे,खजिनदार सुमित भट्टड,सुरेश शिंदे,राजेश जाधव हेही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद भास्कर यांनी केले तर आभार भागवत सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *