“पशु-पक्ष्यांच्या आरोग्यासाठी पोल्ट्रीका…!”

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
सध्या जनावरांमध्ये विचित्र साथीचा आजार बळावत असून अनेक जनावरं त्यामध्ये दगावत आहे. आयुर्वेदाच्या धर्तीवर या आजारांचे शीतपित्त असे विश्लेषण करता येईल आणि याचे प्रमुख कारण म्हणजे जनावरांमधील कुपोषण हे होय. ज्यामुळे त्यांच्यामध्ये ताप येणे,दाह होणे, देवीसारखे फोड येणे असे लक्षणं आढळून येताना दिसतात.
अश्वमेधने नुकतेच “पोल्ट्रीका” हे ब्रॉडस्पेक्ट्रम अँटी व्हायरल प्रोप्रायटरी मेडिसिन फडीए- मुंबई महाराष्ट्रा कडे नोंदणी केली असून त्याच्या संशोधनात्मक चाचण्या ‘लंम्पि’ आजारासहित ‘लाळी खुरकूत’ या आजारावर व्हाव्या यासाठी श्री. राजेश परजणे चेअरमन गोदावरी दूध संघ कोपरगाव यांच्या हस्ते लाँचिंग केले असून या प्रसंगी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप दहे (पशु-धन विकास अधिकारी ),डॉ. थोरे (सहाय्यक आयुक्त पशु संवर्धन),डॉ. जिगळेकर ( सिनियर प्रोजेक्ट ऑफिसर, बायफ,पुणे ),गाढवे साहेब एम.डी. गोदावरी दूध संघ ,डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे आणि एम.सत्यनारायण यांच्या उपस्थित करण्यात आले. या प्रसंगी श्री. राजेश परजणे यांनी नवीन उत्पादनाच्या संशोधनात्मक चाचण्यांसाठी शुभेच्छा दिल्या असून हे उत्पादन दुग्ध व्यवसायात मोठी क्रांती करेल असे सुतवाच केले.
डॉ.थोरे आणि डॉ.दहे यांनी लंम्पि स्किन डिसीज आजाराची तीव्रता सध्या वाढत चालली असून व्हायरल आजारांच्या नियंत्रणासाठी कोणतेही शाश्वत उत्पादन कार्यरत नसून या उत्पादनाबद्दल ते आशावादी असून हे संशोधन कार्य करण्यासाठी अश्वमेधला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. नुकतेच कोळपेवाडी येथील काही जनावरांना या उत्पादनाचे डेमोस्ट्रेशन दिले असता त्याचे साकारत्मक परिणाम आल्यामुळे संशोधक चाचण्यानंतर देश पातळीवर हे उत्पादन दुग्ध व्यवसायांत क्रांतिकारी ठरू शकते असे सूत्रांना सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून अश्वमेधचे मनुष्य, प्राणी आणि पक्षी यांच्या दुर्धर आजारांसाठी आयुर्वेदिक प्रोप्रायटरी मेडिसीन वर संशोधन चालू आहे. या आजारांच्या नियंत्रणासाठी आणि जनावरांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अश्वमेधचे “ पोल्ट्रीका “ हे ट्रायल उत्पादन मोठी भूमिका बजावेल असे मत प्रख्यात शास्रज्ञ डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी उत्पादन लाँचिंग प्रसंगी नमूद केले.दुभत्या जनावरांमध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढवणे हे प्रथम प्राधान्य ठेवून हे उत्पादन शेतकऱ्यांनी प्राथमिक लक्षणे दिसताच १०० मिली प्रतिदिवस २ वेळा सुरु केल्यास पशुधनास त्याचा चांगला उपयोग होतो. तसेच बर्ड फ्लू सारख्या मरतुकीच्या आजारांमध्ये सदर उत्पादन शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.
या पूर्वी अश्वमेध ने ‘मस्टायटिस ‘ सारख्या दुर्धर आजारावर संशोधन करून “मस्टेक” हे प्रोप्रायटरी औषध लाँच केले असून त्याचे पेटंट देखील फाइल करण्यात आले आहे. हजारो शेतकरी मस्टेक या उत्पादनाचे लाभार्थी ठरले आहेत. तसेच कोविड १९ मध्ये अश्वमेधचे प्रोटेक व कॅफेक्स याच्या ट्रेंटमेन्टचे पेटंट मुंबई विज्ञापीठाच्या सहकार्यने प्रकाशित केले असून त्याचा लाखो रुग्णांना देशात फायदा झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *