कोपरगांव प्रतिनिधी:-
प्रति हेक्टरी उसाचे उत्पादन वाढावे यासाठी कोईमतुर उस संशोधन संस्थेचे बळ शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असे प्रतिपादन उपाध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले.
तालुक्यातील मुर्शतपुर ग्रामस्थांचे वतीने जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांची देशपातळीवर नांवलौकीक असलेल्या कोईमतुर उस संशोधन संस्थेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यांत आला ते बोलत होते.
प्रारंभी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी स्वागव व प्रास्तविक केले. याप्रसंगी सर्वश्री अन्वरभाई शेख, साहेबराव शिंदे, गोरख दवंगे, सिताराम तिपायले, बद्रीनाथ देवकर, त्र्यंबकराव दवंगे, मधुकर उगले, प्रकाश दवंगे, असलम शेख, जगन्नाथ दवंगे, चंद्रकांत दवंगे, बापुराव दवंगे, संदिपराव उगले माजी प्रतोद केशव भवर आदि उपस्थीत होते.
श्री. विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, शेतीत संशोधनाला विशेष महत्व आहे. शास्त्रज्ञ हे सातत्याने निरनिराळे प्रयोग करून शेती उत्पादनात आमूलाग्र बदल कसा होईल यासाठी कार्यरत असतात. बदलत्या पर्यावरणीय परिस्थीतीत कमी पाण्यात, कमी खर्चात, अधिक वजन व साखर उतारा देनाऱ्या आणि त्या त्या विभागातील जमीन प्रतवारीत फुलनाऱ्या उस जातीचे संशोधन कोईमतूर संस्थेने केले आहे., तर भविष्यात ऊस लागवडीत येणाऱ्या अडीअडचणी वर संशोधनही सुरू आहे,. बारमाही पीक उत्पादनांत उस शेती फायद्यiची आहे, त्यासाठी शेतकऱ्यांनी बदलत्या अत्याधुनिक शैलीचा वापर करून उत्पादन घ्यावे, शेण खताबरोबर शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या उपाय योजनानुरूप ऊस लागवड करावी, यात येणाऱ्या अडचणी बाबत कोल्हे कारखान्यांच्या उस विकास विभागाशी संपर्क करावा. शेवटी अन्वरभाई शेख यांनी आभार मानले.

फोटो ओळी:-
कोपरगाव मुर्शतपुर ग्रामस्थांनी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांची देशपातळीवर नांवलौकीक असलेल्या कोईमतुर उस संशोधन संस्थेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार केला.
