कोपरगाव तालुक्यातील गावठाण जमीन मागणीचे प्रस्ताव त्वरित मंजूर करा:- शिवाजी ठाकरे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर,कोकम ठाण, कान्हेगाव,वारी सह अनेक ग्रामपंचायत चे गावठाण साठी जागा मागणीचे प्रस्ताव अनेक दिवसांपासून मंजुरी च्या प्रतीक्षेत आहेत ते त्वरित मंजूर करावेत अशी मागणी कोपरगाव तालुका शिवसेनेच्या वतीने महसूल मंत्री ना बाळासाहेब थोरात यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती तालुका प्रमुख श्री शिवाजी ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रक द्वारे दिली आहे, कोपरगाव तालुक्यातील वरील नमूद केलेल्या गावाच्या ग्रामपंचायतीने त्यांच्या परिसरातील शेती महामंडळाच्या मालकीच्या जागेची मागणी गावठाण साठी केलेली असून असे प्रस्ताव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीने महसूल विभागाकडे वाडीव गावठाण मागणीचे प्रस्ताव सादर केले आहे या प्रश्नाकडे माननीय नामदार साहेब यांनी व्यक्तिशः लक्ष घालून ते प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावेत अशी मागणी कोपरगाव तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे, गावामध्ये हजारो लोकांना घरकुले मंजूर झालेली आहेत मात्र त्या नागरिकांना स्वतः ची जागा नाही व ग्रामपंचायत ला गावठाण साठी जागा नाहीत, त्यामुळे संबंधित गोर गरीब लाभार्थी घरकुल योजने पासून वंचित राहत आहेत,तरी मा ना बाळासाहेब थोरात साहेब यांनी या कामी लक्ष घालून संबंधित गावठाण साठी चे जागा मागणीचे प्रस्ताव त्वरित मंजूर करावेत अशी मागणी आज कोपरगाव तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली,निवेदनावर शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी राजे ठाकरे शिवसेना कार्याध्यक्ष रावसाहेब पाटील थोरात शिवसेनेचे तालुका सचिव अशोकराव कानडे शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख किरण खर्डे आदींच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *